नवी दिल्ली:  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारत दौऱ्यावर असून त्यांचे भारतात जोरदार स्वागत केलं जातंय. या स्वागताने भारवलेल्या बोरिस जॉन्सन यांनी आपल्याला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्याचा फील येतोय असं म्हटलं आहे. देशवासियांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, "भारताने केलेल्या स्वागताबद्दल मी भारतीय नागरिकांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. इथल्या लोकांनी आपले आपुलकीने स्वागत केलं. अशा प्रकारचे स्वागत मी या आधी कधीच अनुभवलं नव्हतं. सर्वत्र माझे होर्डिंग्ज पाहिल्यानंतर मला आता सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्याचा फील येतो."


बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख हा खास दोस्त असा केला आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये खास संबंध असल्याचंही ते म्हणाले. 


बोरिस जॉन्सन यांनी आपल्या भारत दौऱ्याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. अहमदाबाद या ठिकाणी सर्वत्र पोस्टर्स झळकल्यानंतर बोरिस जॉन्सन भारावून गेलं आणि आपल्याला सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन असल्याचा फील येत असल्याचं ते म्हणाले. 


अनेक आव्हानं समोर असताना भारत आणि ब्रिटन हे एकमेकांच्या सहकार्यासाठी पुढे आले असं बोरिस जॉन्सन म्हणाले. दोन्ही देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात द्विपक्षीय करार करण्यावर त्यांनी चर्चा केल्याची माहिती दिली. संरक्षण क्षेत्रात या दोन्ही देशांनी मिळून काम करण्यावर भर दिला असल्याचीही माहिती त्यांनी दिली.


दरम्यान, बोरिस जॉन्सन यांना नीरव मोदी आणि विजय माल्याबाबात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, "कायदा मोडणाऱ्यांना ब्रिटनमध्ये थारा नाही. आम्ही नीरव मोदी आणि विजय माल्या यांना भारताकडे सोपवण्यास तयार आहोत. त्यासाठी सर्व मदत करण्यास तयार आहोत."


महत्त्वाच्या बातम्या: