BrahMos Missile Test: भारताने गुरुवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राच्या (BrahMos supersonic cruise missile ) नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 


चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आजच्या क्षेपणास्त्र चाचणीला खूप महत्व आहे. भारताने आज ओडिशाच्या किनारपट्टीवर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी फार महत्त्वाची आहे. कारण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे क्षेपणास्त्र अनेक नवीन गोष्टींनी सज्ज आहे. भारताने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.




10 दिवसांत दुसरी चाचणी
भारताची संरक्षण तयारी किती वेगाने सुरू आहे, याचा अंदाज नवीन वर्षात अवघ्या 20 दिवसांत घेण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या आधुनिक आवृत्तीच्या दुसऱ्या चाचणीवरून लक्षात येते. यापूर्वी 11 जानेवारी रोजी भारताने भारतीय नौदलाच्या गुप्त मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशकाची यशस्वी चाचणी घेतली होती.


ब्राह्मोसची मारक क्षमता 400 किमी
सुपरसॉनिक ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची रेंज 350 ते 400 किलोमीटरची आहे. आयएनएस विशाखापट्टणमवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या समुद्रातून समुद्रात मारा करणाऱ्या आवृत्तीची 11 जानेवारी रोजी  चाचणी घेण्यात आली होती.


ब्रह्मोस हे जगातील सर्वात जलद सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. 2.5 टन वजनाचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र 290 किमी परिसरात ध्वनीच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने मारा करतं. परंतु, नव्या आवृत्तीतील  क्षेपणास्त्राची रेंज 350 ते 400 किलोमीटरची आहे. 


महत्वाच्या बातम्या