Coronavirus Cases Today : देशात कोरोना (Corona) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron variant) रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 3 लाख 17 हजार 532 नवीन रुग्ण आढळले असून 491 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 9287 रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील दैनिक सकारात्मकता दर आता 16.41% आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या 19 लाख 24 हजार 51

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 19 लाख 24 हजार 51 झाली आहे. त्याचबरोबर या कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 87 हजार 693 झाली आहे. आकडेवारीनुसार, बुधवारी दिवसभरात दोन लाख 23 हजार 990 रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत 3 कोटी 58 लाख 7 हजार 29 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

 

आतापर्यंत 159 कोटींहून अधिक डोस देण्यात आले

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत कोरोना लसींचे 159 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. बुधवारी दिवसभरात 71 लाख 38 हजार 592 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 159 कोटी 67 लाख 55 हजार 789 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

 

देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 9287 इतकी

देशात आतापर्यंत 9 हजार 287 लोकांना ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे. यापैकी सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) माहिती दिली आहे की, बुधवारी भारतात कोरोना विषाणूसाठी 19 लाख 35 हजार 180 नमुने चाचण्या करण्यात आल्या होत्या. बुधवारपर्यंत एकूण 70 कोटी 93 लाख 56 हजार 830 नमुने तपासण्यात आले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha