Brahmos Missile : ब्राह्मोस (Brahmos Missile) हे भारताचं क्षेपणास्त्र आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यात अशा अनेक घातक शस्त्रांचा समावेश आहे, ज्यामुळे शत्रू हादरतात आणि या शस्त्रांचा मुकाबला करण्यासाठी शत्रूंना अनेक वेळा विचार करावा लागतो. अशा सर्वात मारक शस्त्रांपैकी एक म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्र. आज या ब्राह्मोस क्षेपणास्त्रला 25 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (Defence Research and Development Organisation) अभिनंदन केलं आहे. या निमित्ताने ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयी अधिक माहिती जाणून घ्या. 






पहिली चाचणी 2001 मध्ये झाली


ब्रह्मोस क्षेपणास्त्र शत्रूची शस्त्रे क्षणार्धात नष्ट करते. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी चांदीपूर येथील जमिनीवर आधारित प्रक्षेपकातून घेण्यात आली होती. त्यानंतर हे क्षेपणास्त्र अनेक वेळा अपग्रेड करण्यात आले आहे. यापूर्वी हे क्षेपणास्त्र फक्त जमिनीवरून डागता येत होते.


25 वर्षांच्या प्रवासात ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे अनेक वेळा अपग्रेड झाले. या दरम्यान या क्षेपणास्त्राची प्रक्षेपण चाचणी जमीन, समुद्र, हवेतून करण्यात आली आहे. हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र केवळ जमिनीवरूनच नाही तर अनेक ठिकाणांहूनही सोडले जाऊ शकते.


हे प्राणघातक क्षेपणास्त्र भारत आणि रशिया या दोघांनी मिळून विकसित केले आहे. सुरुवातीला या क्षेपणास्त्राची मारक क्षमता केवळ 290 किलोमीटरपर्यंत होती, मात्र आता हे क्षेपणास्त्र 300-400 किलोमीटरपर्यंत सहज मारा करू शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा कमाल वेग 3 Mach पेक्षा जास्त आहे, म्हणजेच हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा जवळपास तिप्पट वेगाने मारा करण्यास सक्षम आहे.


या क्षेपणास्त्राला नद्यांचं नाव दिलं आहे


भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये समाविष्ट असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राला भारत आणि रशियाच्या नद्यांची नावे देण्यात आली आहेत. भारताच्या ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाच्या मॉस्क्वा नदीवरून या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आले आहे. ब्रह्मोस हा भारताचा DRDO आणि रशियाचा NPOM यांचा संयुक्त उपक्रम आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Nagaland Elections: नागालँडमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपने खातं उघडलं, काँग्रेस उमेदवाराच्या माघारीने विजयी सुरुवात