Boeing vs Airbus Difference: अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाला गुरुवारी भीषण अपघात (Air India Plane Crash) झाला. गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काहीच मिनिटांत एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. अपघातात 241 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून, केवळ एकाच व्यक्तीचा जीव वाचला आहे.
या अपघातानंतर लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की, एअरबस आणि बोईंग यामध्ये नेमका काय फरक असतो? सामान्यतः जेव्हा आपण विमान प्रवासासाठी जातो किंवा एअरपोर्टवर एखादं विमान पाहतो, तेव्हा ते एअरबस आहे की बोईंग हे ओळखणं थोडं अवघड जातं. मात्र काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हीही दोघांमधील फरक सहज ओळखू शकतात.
नाकाचा भाग (Nose)
बोईंग विमानांच्या नाकाचा भाग टोकदार आणि धारदार असतो, जो पाहताना बाणासारखा दिसतो. त्याउलट, एअरबस विमानांचं नाक गोलसर आणि थोडं सपाट असतं, ज्यामध्ये सौम्य वळण स्पष्टपणे दिसतं.
कॉकपिटच्या खिडक्या (Cockpit Windows)
बोईंगच्या कॉकपिट खिडक्या V-आकारात थोड्या झुकलेल्या असतात आणि शेवटच्या खिडकीचा कोपरा टोकदार असतो. याच्या विरुद्ध, एअरबसच्या खिडक्या अधिक चौकोनी असतात आणि शेवटच्या खिडकीचा वरचा कोपरा थोडासा कापल्यासारखा दिसतो.
इंजिनचा आकार
बोईंगच्या इंजिनांचा वरचा भाग गोलसर आणि खालचा भाग सपाट असतो आणि ते पंखाच्या पुढच्या भागात बसवलेले असतात. दुसरीकडे, एअरबसच्या इंजिनांचा आकार पूर्णपणे गोलसर असतो आणि ते पंखाच्या अगदी खाली, जवळपास जोडलेले असतात.
शेपटीची रचना (Tail Design)
बोईंग विमानांची शेपटी थोड्या उतारासह मुख्य भागाला जोडलेली असते, म्हणजेच ती थोडीशी तिरकी असते. तर एअरबस विमानांची शेपटी सरळ रेषेत आणि कोणत्याही उताराशिवाय जोडलेली असते.
लँडिंग गिअर (Landing Gear)
उड्डाणानंतर बोईंग विमानांच्या मागील लँडिंग गिअरचा काही भाग बाहेरून दिसतो, कारण त्यांना झाकण (कव्हर) नसते. त्याउलट, एअरबस विमानांचे मागील गिअर पूर्णपणे विमानाच्या आत बंद होतात आणि बाहेरून दिसत नाहीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या