रुद्रप्रयाग  : केदारनाथधामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झाले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 7 प्रवासी होते. अपघातानंतर रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरू आहे. या अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. गौरीकुंड-सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती. यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावून जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

Continues below advertisement


मृतांमध्ये 2 मुलांचाही समावेश आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशनचे होते. गौरीकुंडमध्ये हा अपघात झाला आहे, केदारनाथ धामहून फाटा येथे येणारे हेलिकॉप्टर कोसळले आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील गौरीकुंड परिसरात एक मोठा अपघात झाला आहे. रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण होते. या दुर्दैवी अपघातात सर्व जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी कोसळले. गौरीकुंड परिसरात हा अपघात झाला. ही घटना पहाटे 5.30 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जण असल्याची माहिती आहे. 


आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा देत होते. यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धाम गाठत असतात. दरम्यान, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होत असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकृत मृतांची संख्या आणि इतर तपशील लवकरच प्रशासनाकडून जाहीर केला जाणार आहे. उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये 7 जण होते. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5:17 वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे 7 भाविकांना घेऊन निघाले. वाटेत खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी कठीण लँडिंगला गेले त्यामुळे दुर्घटना झाली आहे.






हेलिकॉप्टरमध्ये कोण-कोण होते?


1. राजवीर-वैमानिक
2. विक्रम रावत बीकेटीसी रहिवासी रासी उखीमठ
3. विनोद
4. तृष्टि सिंह
5. राजकुमार
6. श्रद्धा
7. राशि


मुख्यमंत्री धामी यांनी घटनेबाबत व्यक्त केले दुःख


मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबद्दल अतिशय दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.