खानापूर (बेळगाव) : खानापूर तालुक्यातील तोराळी येथील सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात झालेल्या स्फोटात स्थानिक चार व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी ही घटना घडली आहे. या पैकी तीन जणांवर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे.
संध्याकाळी या चार व्यक्तीनी प्रतिबंधित क्षेत्रात आपली गुरे शोधण्यासाठी प्रवेश केला. चौघांपैकी तीन जण पुढे चालत होते, तर एक जण मागे होता. गवतात असलेल्या स्फोटकाला स्पर्श झाला आणि स्फोट झाला. यावेळी पुढे असणाऱ्या तिघे जास्त जखमी झाले. मागून येणाऱ्याला फक्त हातापायाला लागले. तोराळी येथे गोळीबार आणि स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण तोराळी येथे प्रशिक्षणार्थींना दिले जाते. त्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे स्फोट होऊन चार जण जखमी झाले आहेत. स्फोटाचा आवाज ऐकल्यावर प्रशिक्षण केंद्रातील जवानांनी स्फोट झालेल्या ठिकाणी धाव घेतली. त्या चार जखमींवर त्यांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्याची व्यवस्था केली.
या चारही जणांनी चरण्यास गेलेली आपली जनावरे शोधण्यासाठी तोराळी येथील प्रशिक्षण केंद्रात प्रवेश केला होता अशी माहिती बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी दिली आहे. या चार व्यक्तींवर निर्बंधित क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल खानापूर पोलिसात प्रकरण नोंद करण्यात आले आहे.
तोराळी येथील सीआरपीएफचे कोब्रा वारफेर ट्रेनिंग सेंटर आहे. येथे जंगलातील तसेच अतिरेकी, दहशतवाद विरोधी मोहिमेचे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत दुर्गम भागात हे प्रशिक्षण केंद्र असून तेथे नेहमी प्रशिक्षण सुरु असते.
बेळगावातील CRPF प्रशिक्षण केंद्रात स्फोट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2018 08:17 PM (IST)
तोराळी येथील सीआरपीएफचे कोब्रा वारफेर ट्रेनिंग सेंटर आहे. येथे जंगलातील तसेच अतिरेकी, दहशतवाद विरोधी मोहिमेचे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत दुर्गम भागात हे प्रशिक्षण केंद्र असून तेथे नेहमी प्रशिक्षण सुरु असते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -