मुंबई : ईशान्य भारतातून रोहिंग्या आता केरळमध्ये बस्तान बसवण्याच्या विचारात आहे. तसं पत्रच दक्षिण रेल्वेच्या आरपीएफच्या प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांनी लिहिलं आहे. चेन्नई सेंट्रल, तिरुचिरापल्ली, मदुराई इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, रोहिंग्या दिसले तर त्याबाबत पोलिसांना सूचना देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मोठ्या प्रमाणात रोहिंग्या केरळमध्ये येण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्या स्टेशनवरुन कोणत्या गाडीतून कुठे येणार, याची देखील माहिती देण्यात आली आहे. हे पत्र 26 सप्टेंबरला सर्व वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांना पाठवले गेले आहे.
इतकेच नाही, तर जर रोहिंग्या ट्रेनमध्ये आढळल्यास त्यांना पकडून स्थानिक पोलिसांकडे सोपवण्याचे आदेश देखील देण्यात आलेत.
या गाड्यांमधून येणार असल्याची सूचना :
१२५०८ सिलचर - त्रिवेंद्रम,
१२५१६ सिलचर - त्रिवेंद्रम
२२८२५ शालिमार - चेन्नई सेंट्रल स्टेशन
२२६४२ शालिमार - त्रिवेंद्रम
१२८४१ हावडा - चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस ,
१२८३९ हावडा - चेन्नई सेंट्रल मेल
१२६६५ हावडा - छत्रापुर
१२६६३ हावडा - तिरुचिरापल्ली
२२८४१ संत्रागछी - चेन्नई सेंट्रल स्टेशन अंत्योदया एक्स्प्रेस
२२८०७ संत्रागछी - चेन्नई एक्स्प्रेस एसी एक्स्प्रेस
०६००९ संत्रागछी - पुडुचेरी
०६०५७ संत्रागछी - चेन्नई सेंट्रल स्पेशल
१५६३० गुवाहाटी - ताम्बरम
१५९३० दिब्रुगड - ताम्बरम