नवी दिल्ली : अगोदर फोर्टिस हॉस्पिटल, नंतर मॅक्स आणि आता दिल्लीतील एका रुग्णालयात निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. दिल्लीतील करोल बाग येथील बीएल कपूर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गेला, त्यात रुग्णालयाने 19 लाख रुपयांचं बिल हातात ठेवलं, असा आरोप ग्वालियर येथील नीरज गर्ग यांनी केला आहे.
नीरज गर्ग यांनी 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मुलीला बीएल कपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. 11 नोव्हेंबर रोजी रुग्णालयाने मुलीला बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट केलं. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मुलीची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. मुलीला संसर्ग झाला असल्याचा समोर आलं.
''मुलीला ताप येत असल्याचं सतत डॉक्टरांना सांगितलं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. प्रकृती जास्त बिघडल्यानंतर डॉक्टरांनी मुलीला आयसीयूमध्ये शिफ्ट केलं. मात्र मुलीला आता वाचवलं जाऊ शकत नाही, असं म्हणत डॉक्टरांनी 25 नोव्हेंबर रोजी हात झटकले'', असा आरोप नीरज गर्ग यांनी केला.
दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी या घटनेची माहिती नसल्याचं सांगितलं आहे. तर इंडियन मेडीकल असोसिएशनने आरोपांनंतर रुग्णालयाचा बचाव केला आहे. रुग्णालयांवर असे आरोप लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मॅक्स आणि फोर्टिस हॉस्पिटलवर अशा निष्काळजीपणाचा आरोप लावण्यात आला होता.
दिल्ली सरकारने शालीमार बाग मॅक्स रुग्णालयाचा परवाना रद्द केला आहे. तर फोर्टिस हॉस्पिटलविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच आला बीएल कपूर रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे उपचाराच्या नावावर रुग्णांची केवळ लूटच केली जाते का, असा सवाल निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणावर अद्याप रुग्णालयाची बाजू समोर आलेली नाही.
उपचार करताना मुलीचा मृत्यू, तरीही 19 लाखांचं बिल हातात ठेवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Dec 2017 05:53 PM (IST)
बीएल कपूर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गेला, त्यात रुग्णालयाने 19 लाख रुपयांचं बिल हातात ठेवलं, असा आरोप ग्वालियर येथील नीरज गर्ग यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -