अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने (आयबी) वर्तवली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला अहमदाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.


सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्था, तसंच ट्रॅफिकचं कारण देत रोड शो ला परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं. मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या अलर्टमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून गुजरात पोलिसांना दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी आणि राहुल गांधींसह बड्या राजकीय नेत्यांना देखील रोड शोला परवानगी न देण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.

आयबीच्या सुत्रांच्या मते, अहमदाबादमध्ये 'लोन वोल्फ अटॅक' होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजच्या रोड शोला परवानगी नाकारण्यात आली आहे.

'लोन वोल्फ अटॅक' म्हणजे काय?

'लोन वोल्फ अटॅक' हा कुणा एका दहशतावाद्याकडून केला जातो. यासाठी दहशतवादी गर्दीच्या ठिकाणांचा वापर करुन आपल्या टार्गेटवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या वाहनाचा वापर किंवा अफवा पसरवून देखील हल्ला केला जाऊ शकतो.

नुकतंच स्पेनच्या बार्सिलोनामध्ये एक लोन वोल्फ अटॅक करण्यात आला होता. यामध्ये रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांना ट्रकनं चिरडण्यात आलं होतं.

14 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान

दरम्यान, गुजरातमधील पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून आता दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानही 14 डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी 68 टक्के मतदान झालं. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार प्रचार सुरु केला आहे. या प्रचारालाही अवघे काही तास बाक असताना अशाप्रकारे पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीनं गुजरात पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे.

संबंधित बातम्या :

सीडी बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामा विसरली : हार्दिक पटेल

मोदींना 'नीच' म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यरांवर काँग्रेसची तात्काळ कारवाई

मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा

योगी गुजरातमध्ये, मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी

गुजरात निवडणुकीवर आतापर्यंत 500 कोटींचा सट्टा, कोण जिंकणार?

मी नरेंद्रभाईसारखा नाही, माणूस आहे, चुकतो : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं

ओपिनियन पोल : उत्तर गुजरातमध्ये भाजपला धक्का, कोण बाजी मारणार?

ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'