Rakesh Tikait On UP Election 2022 : पुढच्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लढवण्याबाबत अद्याप मी कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे. मात्र, वेळ आल्यावर तुम्हाला कळवू, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अद्याप निवडणुका सुरू झालेल्या नाहीत. आचारसहिंता देखील लागू झालेली नाही, त्यामुळे योग्य वेळी निर्णय सांगू असे टिकैत यांनी सांगितले.
राकेश टिकैत हे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिले होते. सध्या दिल्लीतील शेतकरी आंदोलन संपले असले तरी राकेश टिकैत हे सतत चर्चेत आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन संपले असले तरी आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने आंदोलन मागे घेताना शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या देखील मान्य करण्याते आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. हमीभावाच्या संदर्भात केंद्र सरकारने समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप समिती नेमली नाही. हरियाणामध्ये शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते, अद्याप ते गुन्हे मागे घेण्यात आले नसल्याचे टिकैत म्हणाले. तसेच शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना शेतकऱ्यांनी कोणतीही मदत केलेली नाही.
26 जानेवारीला प्रत्येक गावांमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढावी. ट्रॅक्टरवर तिंरगा झेंडा लावून हा मार्च काढावा. 26 जानेवारी हा आपला दिवस आहे. याबाबत आम्ही 15 जानेवारीला बैठक घेणार आहोत. या बैठकीत आम्ही 26 जानेवारीच्या मार्चबाबत तसेच, सरकारने जी आश्वासने पूर्ण केली नाहीत, त्याबाबत चर्चा करणार आहोत. तसेच पुढील रणणिती देखील त्यादिवशी ठरवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये काही शेतकरी संघटना निवडणुका लढवत आहेत. यामुळे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले.
केंद्र सरकार ऑस्ट्रेलियामधून दूध खरेदी करण्यासंदर्भात करार करण्याच्या तयारीत आहे. यातून दूध 20 ते 22 रुपयांना विकण्याचा सरकारचा मानस आहे. परदेशातून दूध खरेदी करण्याचा निर्णय घातक आहे. त्यामुळे देसातील दुग्ध उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: