नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे वडील नारायणलाल नड्डा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी चांदपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे. नारायण लाल नड्डा हे बिलासपूर जिल्ह्यातील विजयपूर निवासस्थानी राहतात.


श्वास घेण्यास त्रास
शनिवारी सकाळी जेपी नड्डा यांचे वडील नारायणलाल नड्डा यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना चांदपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, असे सांगितले जात आहे. त्यांच्या चाचण्यांचे अहवाल सामान्य असल्याचे सांगितले जाते. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेले आहे.