श्रीनगर : जम्मू काश्मिरमधील भाजप आमदार गगन भगत अडचणीत येण्याची शक्यता आहे. भगत यांचे महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा त्यांची पत्नी मोनिका शर्मा यांनी केला आहे.
गगन भगत यांनी संबंधित विद्यार्थिनीसोबत लग्न केल्याचा संशयही त्यांच्या पत्नीला आहे. मोनिका आणि गगन यांच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत.
विशेष म्हणजे विद्यार्थिनीच्या वडिलांनीही गगन भगत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भगत यांनी आपल्या मुलीचं अपहरण केल्याचं तरुणीच्या वडिलांचं म्हणणं आहे.
आमदार भगत आणि विद्यार्थिनी यांनी मात्र हा आपली प्रतिमा मलीन करण्याचा डाव असल्याचं सांगितलं आहे. पत्नीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मोनिका शर्मा यांनी पतीचा दावा फेटाळला आहे. दहा महिन्यांपासून आम्ही वेगळे राहत आहोत, मात्र घटस्फोटासाठी धाव घेतलेली नाही, असं त्या म्हणतात.
मोनिका शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदतीची याचना केली आहे. 'तुमच्या कुटुंबातील एका मुलीला न्याय हवा आहे. फक्त माझ्यासाठीच नाही, माझ्या मुलांसाठीच नाही, तर 19 वर्षांच्या 'त्या' महाविद्यालयीन विद्यार्थिनीसाठीही' असं मोनिका म्हणतात.
पुरावा नसल्यामुळे मी वर्षभर गप्प बसले होते. मात्र आता माझ्याकडे आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट असल्याचं मोनिका सांगतात.
पतीचं विद्यार्थिनीशी दुसरं लग्न, भाजप आमदाराच्या पत्नीचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2018 01:10 PM (IST)
भाजप आमदार गगन भगत यांचे महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा त्यांची पत्नी मोनिका शर्मा यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -