भाजप मंत्र्याचा प्रताप, कार्यकर्त्याकडून साफ करून घेतली चप्पल
एबीपी माझा वेब टीम | 15 Nov 2018 06:54 PM (IST)
कॅबीनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह बुद्ध पीजी महाविद्यालयात वृक्षारोपन कार्यक्रमाला गेले असता, तेथे हा प्रकार घडला आहे
लखनौ: उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचा अजब कारभार समोर आला आहे. योगींच्या मंत्रीमडंळातील मंत्री राजेंद्र प्रताप सिंह यांनी आपल्या चपलेवर लागलेली माती कार्यकर्त्याकडून साफ करुन घेतल्याची घटना समोर आली आहे. मात्र याबाबत मंत्रीमहोदयांना विचारले असता त्यांनी असे काही घडले नसल्याचा दावा केला. कॅबीनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह बुद्ध पीजी महाविद्यालयात वृक्षारोपन कार्यक्रमाला गेले असता, तेथे हा प्रकार घडला आहे. ते गाडीतून उतरत असताना त्यांच्या पायातून चप्पल निघाली, आणि त्यांच्या चपलेला माती लागली. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्याला इशारा केला असता, त्या कार्यकर्त्याने लगेच राजेंद्र सिंह यांची चपलेला लागलेली माती साफ केली. पत्रकारांनी जेव्हा त्यांना याबाबत विचारल असता, त्यांनी असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगीतले. मंत्री महोदयांनी स्वत: आपली चप्पल साफ केली, असे म्हणत कार्यक्रमाच्या आयोजकांनी राजेंद्र सिंह यांची पाठराखण केली. मात्र फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कार्यकर्ता राजेंद्र प्रसाद यांच्या चपलीवरील माती साफ करत आहे.