इंफाळ : भाजपने मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारी जाहीर केला आहे. नाँगथाँबम बिरेन सिंह हे मणिपूरचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती मणिपूरचे केंद्रीय निरीक्षक विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली.


भाजपने पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. हेंगँग मतदार संघाचे आमदार बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. बिरेन सिंह आता सरकार स्थापनेचा दावा करतील.

मणिपूर विधानसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपने मित्रपक्षांना सोबत घेत बहुमत असल्याचा दावा केला आहे. राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

भाजपने स्वतःचे 21, एनपीपीचे अध्यक्ष आणि चार आमदार, एक काँग्रेस आमदार, एक एलजेपी आमदार आणि तृणमूलच्या एका आमदारासोबत राज्यपालांची भेट घेतली होती.

60 आमदार असलेल्या मणिपूर विधानसभेसाठी 31 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपने आपलं संख्याबळ 32 असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं. त्यामुळे राज्यपाल आता सरकार स्थापनेसाठी कुणाला निमंत्रित करतात, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :


24 तासात राजीनामा, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचं एक पाऊल मागे


मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देण्यास नकार