नवी दिल्ली : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनीही राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मनोहर पर्रिकर उद्या संध्याकाळी पाच वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
गोव्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं : सूत्र
याआधी अरुण जेटली यांच्याकडेच संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा मंत्रिमंडळाची स्थापना केली, त्यावेळी त्यांच्याकडे अर्थ मंत्रालयासोबतच संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती.
त्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान मोदींनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना संरक्षण मंत्री बनवलं होतं.
मनोहर पर्रिकरांचं गोव्यात ‘मुख्यमंत्री’ म्हणून कमबॅक
आता मनोहर पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. उद्याच त्यांचा शपथविधी पार पडेल.
गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. 40 जागांच्या विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला भाजप पक्ष इतर पक्षांच्या साथीने सरकार स्थापन करणार आहे. भाजपने 21 आमदाराचं समर्थन असल्याचा दावा केला आहे. परिणामी 17 जागा मिळवणारा सर्वात मोठा पक्ष काँग्रेस सत्तेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
संबंधित बातम्या
गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव, तीन उमेदवारांना एकूण 792 मतं
भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं
गोव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव