मुंबई : "जिंदगी लंबी नहीं बल्कि बड़ी होनी चाहिए.." हे वाक्य सिनेमातील असलं तर संपूर्ण जीवनाचा सार यातून दिसतो. ज्या कोणी हे अवलंबलं तो अमर झाला. असंच एक व्यक्तिमत्त्व होतं शहीद-ए-आज़म भगत सिंह. भगत सिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता तर 23 मार्च 1931 रोजी भारतमातेचा हा सुपुत्र हसत हसत फासावर गेला. आपल्या जिद्द आणि साहसाच्या जोरावर इंग्रजांना हादरवून टाकणाऱ्या भगत सिंह यांच्या नसा-नसात देशभक्ती आणि क्रांती होती.


संपूर्ण कुंटुंबच देशभक्त
भगत सिंह यांच्या जन्म शिख कुटुंबात झाला होता. भगत सिंह यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील किशन सिंह जेलमध्ये होते तर त्यांचे काका अजित सिंह हे देखील इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. इंग्रजांनी अजित सिंह याच्यावर 22 गुन्ह्यांची नोंद केली होती आणि त्यांची रवानगी इराणला केली होती. तिथे त्यांनी आझाद हिंद फौजची स्थापना केली आणि क्रांतीची मशाल पेटवत ठेवली.


आजी-आजोबांनी नाव ठेवलं 'भगत सिंह'
सरदार किशन सिंह आणि विद्यावती यांच्या पोटी जन्मलेल्या भगत सिंह यांचे आजोबा अर्जुन सिंह आणि आजी जयकौर यांनी त्यांना नशिबवान म्हणत 'भगत सिंह' असं त्यांचं नामकरण केलं. त्यांना नशिबवान यासाठी समजलं गेलं की, भगत सिंह यांच्या जन्मानंतर काही काळात स्वातंत्रसैनिक असल्याने लाहोर जेलमध्ये बंद असलेले त्यांचे वडील सरदार किशन सिंह यांची सुटका करण्यात आली. तर त्यांच्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही काकांची जामीनावर सुटका झाली.


जालियनवाला बाग हत्याकांडाचा परिणाम
13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी या सणाच्या दिवशी रोलट अॅक्टच्या विरोधात देशवासियांनी जालियनवाला बागमध्ये सभा बोलावली होती. इंग्रज सरकारला ही बाब रुचली नाही. जनरल डायरच्या क्रूर आणि जाचक आदेशांमुळे निशस्त्र लोकांवर इंग्रजांच्या सैनिकांनी बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर देशभर क्रांतीची आग आणखी भडकली.


12 वर्षांच्या भगत सिंह यांच्यावर या सामूहिक हत्याकांडाचा खोलवर परिणाम झाला. त्यांनी जालियनवाला बागेच्या त्या रक्तरंजित धरतीची शपथ घेतली की इंग्रजांविरोधात ते आझादीचा शंख फुंकणार. यानंतर पुढे त्यांनी लाहोर नॅशनल कॉलेजमधील शिक्षण सोडून 'नौजवान भारत सभा'ची स्थापना केली.


कुटुंबीयांनी लग्नासाठी दबाव टाकल्याने घर सोडलं
एक काळ असाही आला जेव्हा कुटुंबीयांनी भगत सिंह यांच्या लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पण त्यांच्यासाठी आझादी हीच नववधू होती. कुटुंबीयांच्या दबावाला कंटाळून त्यांनी घरही सोडलं होतं. "मी माझं आयुष्य आझादी-ए-हिंदसाठी समर्पित केलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात आराम आणि ऐहिक इच्छांसाठी कोणतीही जागा नाही," असं भगत सिंह यांनी घर सोडून जाताना म्हटलं होतं. यानंतर लग्नासाठी दबाव न टाकण्याचं आश्वासन कुटुंबियांकडून मिळाल्यानंतरच ते घरी परतले.


'साँडर्स-हत्या, दिल्लीच्या सेंट्रल असेम्ब्लीमध्ये बॉम्बफेक
इंग्रजांच्या जाचक धोरणांविरोधात लाला लाजपत राय शांततेत आंदोलन करत होते. तेव्हा पोलीस अधीक्षक स्कॉट आणि त्यांच्या साथीदारांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये लाला लाजपत राय जबर जखमी झाले आणि 17 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. लाला लाजपत राय यांच्या निधनानंतर भगत सिंह यांनी साँडर्सची हत्या केली आणि त्यानंतर दिल्लीच्या सेंट्रल असेम्ब्लीमध्ये चंद्रशेखर आजाद आणि पक्षाच्या इतर सदस्यांसह बमस्फोट करुन ब्रिटिश साम्राज्याला खुलं आव्हान दिलं. भगत सिंह यांनी आपले दोन साथीदार सुखदेव आणि राजगुरु यांच्यासोबत काकोरी कांड पूर्णत्वास नेलं. यामुळे इंग्रजांच्या मनात भगत सिंह यांच्या नावाची भीती आणि दबदबा निर्माण झाला.


भगत सिंह यांना अटक
सेंट्रल असेम्ब्लीमध्ये बॉम्ब फेकल्याच्या घटनेनंतर इंग्रज सरकारने स्वातंत्र्यसैनिकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांना अटक झाली. दोघांवर सेंट्रल असेम्ब्लीमध्ये बॉम्ब फेकल्याप्रकरणी खटला चालला. सुखदेव आणि राजगुरु यांनाही अटक करण्यात आली. 7 ऑक्टोबर 1930 रोजी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.


जेलमधील भगत सिंह अखेरचा वेळ
भगत सिंह यांना पुस्तकं वाचण्याचा छंद होता. त्यांनी अखरेच्या काळात 'रिवॉल्युशनरी लेनिन' नावाचं पुस्तक वाचण्यास मागितलं होतं. त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटण्यास पोहोचले. भगत सिंह यांनी पुस्तकाबाबत विचारणा केली. मेहतांनी पुस्तक दिलं आणि भगत सिंह यांनी तातडीने पुस्तक वाचण्यास सुरुवात केली. यानंतर तुम्हा देशवासियांना कोणता द्यायचा का असं विचारलं. भगत सिंह म्हणाले की, "फक्त दोन संदेश आहेत, साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद."


यानंतर काही वेळाने भगत सिंह यांच्यासह राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी देण्यासाठी जेलच्या कोठडीतून बाहेर आणलं. को फांसी देने के लिए जेल की कोठरी से बाहर लाया गया. या तिघांनी भारतमातेला नमन केलं आणि स्वातंत्र्यांची गीतं गात फासावर चढले.