नवी दिल्ली : कोरोना साथीच्या आजाराने संक्रमित देशांमध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आहे. तर कोविड 19 मुळे झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशात एक दिलासा देणारी बातमी आली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन संक्रमित रूग्णांच्या तुलनेत बरे होणार्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहे.
गेल्या चोवीस तासांत भारतात 92,043 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. तर संसर्ग झालेल्या 88,600 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतचं 1124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या 59,92,532 आहे तर आतापर्यंत 94,503 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 9,56,402 अॅक्टीव रूग्ण आहेत तर आतापर्यंत 49,41,627 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या लोकांची संख्याही सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या नवीन कोरोना रुग्णांपेक्षा जास्त आहे.
- 19 सप्टेंबर 93,337 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 95,880 रुग्ण बरे झाले.
- याचप्रमाणे 22 सप्टेंबरला 75,083 नवीन कोरोना संक्रमित झाले तर बरे होणाऱ्यांची संख्या तब्बल 1,01,468 इतकी आहे.
- तर 26 सप्टेंबरला 85,362 लोकांना कोरोनाची लागण झाली तर 93,420 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
भारतात संसर्गातून रिकवर होण्याची वेग वाढत आहे.
- 6 जुलै रोजी रिकवरी रेट 60.85% होता.
- 1 ऑगस्ट रोजी रिकवरी रेट 64.52% होता.
- 20 ऑगस्ट रोजी रिकवरी रेट 73.90% होता.
- 1 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 76.93% होता.
- 11 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 77.65% होता.
- 20 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 79.68% होता,
- 27 सप्टेंबर रोजी हा दर वाढून 82.46% झाला.
रिकवरी रेट म्हणजे मृत्यूचे प्रमाण कमी होत असताना संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. 27 सप्टेंबर रोजी देशात मृत्यूचे प्रमाण 1.58% होते. त्याचवेळी, रुग्ण संसर्गातून बरे होत असताना अॅक्टीव रुग्णांची संख्याही कमी होत आहे. 19 सप्टेंबरला 10,13,964 अॅक्टीव रुग्ण होते तर 24 सप्टेंबरला हीच संख्या 9,66,382 आली आहे. 27 सप्टेंबरपर्यंत ही संख्या आणखी कमी होऊन 9,56,402 वर गेली. म्हणजेच, दररोज बरे होणार्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने अॅक्टीव रुग्णांची संख्याही कमी होत आहे.
Corona Vaccine | केईएम रुग्णालयात आजपासून ऑक्सफर्ड आणि सिरमच्या लशीची चाचणी