Mumbai to London in 100 Days: जगातील विविध ठिकाणं एक्सप्लोअर करणे, विविध देशांच्या सफरीवर जाणं हे अनेकांचे स्वप्न असतं. गेल्या शतकभरात अशा प्रकारचे प्रवास प्रामुख्याने जहाजांच्या माध्यमातून, सागरी वाहतुकीद्वारे केले जात होते. पण सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील जलद प्रगतीमुळे वाफेची इंजिने, कार आणि विमानांचा शोध लागल्याने प्रवास अधिक सुलभ झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना जगाच्या विविध भागात जाणं सोपं झाले आहे. आज अनेक जणांना बाईकच्या माध्यमातून जगाचा प्रवास करण्यास स्वारस्य आहे. या ट्रेंडला अनुसरून महाराष्ट्रातील एका तरुणाने आपल्या बाईकवरून मुंबई ते लंडन असा प्रवास करण्याचं निश्चित केलं आहे. योगेश आलेकरी असं या तरुणाचं नाव असून 1 मे पासून तो मुंबईतून आपल्या प्रवासाला सुरुवात करणार असून 100 दिवसात लंडनला पोहोचण्याचं त्याचं ध्येय आहे. 


गेल्या सहा-सात वर्षांपासून बाईकवरुन वेगवेगळे प्रवास करणाऱ्या  योगेश आलेकरी या अनुभवी बाइकरने मुंबई ते लंडन असा थरारक प्रवास करण्याची आपली योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले बाईकरवरुन पालथे घालणारा योगेश आता जगातले तीन खंड आणि 24 देश त्याच्या बाईकवरून प्रवास करण्याचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. 


योगेश आलेकरीचा हा प्रवास 25,000 किलोमीटरचा असून 100 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याची त्यांची योजना आहे, 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून तो या प्रवासाला सुरुवात करणार आहे.


योगेशने मोटारसायकलवरून अनेक देशांचा प्रवास करून जगभर बाईक फेरफटका मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या या मुंबई ते लंडन प्रवासाबद्दल बोलताना योगेल आलेकरी म्हणाला की, “बहुतेक देशांना बाईकवरुन भेट दिल्यानंतर, बाईकवर जगाच्या सहलीला जाण्याचे माझे स्वप्न होते. त्या दिवसांत मला या दौऱ्याची कल्पना आली. मुंबईहून लंडनला बाईकने जाण्याचा माझा प्लॅन आहे. या प्रवासादरम्यान, मी 24 देशांना भेट देईन आणि तीन खंड पार करेन आणि मी सुमारे 25,000 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या दौऱ्यासाठी मला ३० लाख रुपये खर्च येईल. मला वेगवेगळ्या देशांचा व्हिसा लागेल आणि माझी बाईक एअर कार्गोने पाठवली जाईल. या दौऱ्याच्या तयारीसाठी मी एक दिवसाचीही रजा घेतलेली नाही."


ही बातमी वाचा: