Sharad Yadav : माजी केंद्रीय मंत्री आणि लोकतांत्रिक जनता दलाचे (LJD) प्रमुख शरद यादव यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलामध्ये (RJD) विलीन केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत शरद यादव यांनी त्यांचा लोकतांत्रिक जनता दल हा पक्ष राष्ट्रीय जनता दलामध्ये  विलीन केला. यावेळी तेजस्वी यादव यांनी त्यांचे स्वागत केले. आमच्या पक्षाचं राजदमध्ये विलिनीकरण होणे म्हणजे विरोधी पक्षांची एकजूटीकडे वाटचाल होण्याच्या दिशेनं पहिले पाऊल असल्याचे शरद यादव म्हणाले.


दरम्यान, भाजपचा पराभव करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये विरोधी पक्षांची एकजूट होण्याची गरज आहे. सध्यातरी एकीकरण करणं आमची प्राथमिकता आहे. यानंतर आम्ही ठरवू की, या एकजूट झालेल्या विरोधकांचं नेतृत्व कोण करेल असेही शरद यादव यावेळी म्हणाले. शरद यादव यांच्या दिल्लीतील घरी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यादव यांच्या नेतृत्वाखाली ही शरद यादव यांच्या पक्षाचे विलिनीकरण करण्यात आले.
जनता दल युनायटेडमधून बाहेर पडल्यानंतरच शरद यादव यांनी लोकतांत्रिरक जनता दल या आपल्या वेगळ्या पक्षाची स्थापना केली होती. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने शरद यादव यांनी विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सध्या शरद यादव यांचे 74 वय आहे. गेल्या काही दिवसांपासानू शरद यादव यांची प्रकृती देखील ठीक नाही. 


दरम्यान, लालूप्रसाद यादव यांनी 3 ऑगस्ट 2021 ला नवी दिल्लीत शरद यादव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद यादव यांनी लालूंशी राजकीय विषयांवर खुलेपणानं भाष्य केलं होतं. त्यानंतर शरद यादव हे आपला पक्ष विलीन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, नितीश कुमार यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदामुळं शरद यादव यांनी JDU मधून बंडखोरी करुन 2018 मध्ये लोकतांत्रिक जनता दल नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. शरद यादव यांच्यासह अली अन्वरसह अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर शरद यादव यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही मधेपुरा येथून आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, जेडीयूच्या दिनेश्वर यादव यांच्याकडून त्यांचा 1 लाख मतांनी पराभव झाला होता.


महत्त्वाच्या बातम्या: