Nitish Kumar : इथून पुढे आयुष्यात कधीही भाजपबरोबर (BJP) जाणार नसल्याचे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी केलं. सध्या आपण जिथे आहोत तिथेच एकत्र राहून, बिहार आणि देशाची प्रगती करू असेही नितीश कुमार यावेळी म्हणाले. नितीश कुमार यांनी शुक्रवारी समस्तीपूरमधील येथील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली.यावेली त्यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपबरोबर जाणार नसल्याचे वक्तव्य केलं. तसेच यावेळी नितीश कुमार यांनी भाजपवर जोरदार टीका केली.


दरम्यान, 2017 पूर्वी नितीश कुमार यांनी मिट्टी में मिल जाएंगे लेकिन बीजेपी के साथ नहीं जाएंगे असं वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नसल्याचे वकव्य केलं आहे. दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत लालू प्रसाद यादव यांच्यासोबत घरोबा केला आहे. भाजपशी असणारी युती तोडून त्यांनी पुन्हा महाआघाडीसोबत सरकार स्थापन केलं. 


भाजपवर जोरदार निशाणा


समस्तीपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे लोक फालतू बोलतात. त्यांचे नेते चुकीची वक्तव्य करत आहेत. भाजप केवळ समाजात संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यांचा देशाच्या विकासाशी काहीही संबंध नसल्याचे नितीश कुमार म्हणाले. भाजपवाल्यांनी केवळ भांडण लावण्याचे काम केल्याचे नितीश कुमार म्हणाले.


केंद्रात बसलेल्या लोकांना विकासाची चिंता नाही


आजकाल भाजपचे लोक माझ्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत आहेत. अटलबिहारी वाजपेयी असोत, लालकृष्ण अडवाणी असोत की मुरली मनोहर जोशी या सर्वांनी देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे. पण आज जे केंद्रात बसले आहेत त्यांना विकासाचे काहीच देणं घेणं नसल्याची टीका नितीश कुमार यांनी भाजपवर केली. बिहारमधील अभियांत्रिकी महाविद्यालय पाटणा ही देशातील सर्वात जुनी संस्था आहे. मी त्याचा विद्यार्थी आहे. 1998 मध्ये जेव्हा अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी अटलबिहारी बाजपेयींनी मला केंद्र सरकारमध्ये मंत्री केले. त्यावेळी केंद्र सरकारने तीन विभागांची जबाबदारी सोपवली होती. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी खूप काम केले, पण आज केंद्रात बसलेल्या लोकांना विकासाची कोणतीही चिंता राहिली नसल्याचे नितीश कुमार म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Lok Sabha Election 2024: 'देशातून भाजपला संपवू', लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट