Heroin Seized in Gujarat : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कच्छ जिल्ह्यातील किनारी भागात एका खाडीतून जप्त केलेल्या बॅगमध्ये 250 कोटी रुपयांचं हेरॉइन सापडलं आहे. एटीएसनं (ATS) सोमवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. हे हेरॉईन पाकिस्तान तस्करांकडून फेकण्यात आलं असल्याचं एटीएसनं सांगितलं आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पोलिसांनी रविवारी जखाऊ जवळ 49 बॅग जप्त केल्या होत्या. याआधी 30 मे रोजी तटरक्षक दल आणि एटीएसनं अरबी समुद्रातून भारतीय सीमेअंतर्गत सात पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती.
गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. पी. रोझिया यांनी सांगितलं की, 'गुजरातमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करण्याच्या योजना आखत असलेल्या तस्करांसंबंधित मिळालेच्या सूचनेवरून, बोटीचा कॅप्टन मोहम्मद अक्रम याने तटरक्षक दलाचे जहाज जवळ येत असल्याचे पाहून दोन पिशव्या समुद्रात फेकून दिल्या. तटरक्षक दल आणि एटीएसने 30 मे रोजी अल नोमान या पाकिस्तानी बोटीला सात जणांसह पकडलं होतं. रोजिया यांनी सांगितलं की, फॉरेन्सिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, 49 बॅगमध्ये सुमारे 50 किलो हेरॉईन होतं. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 250 कोटी रुपये आहे.'
छत्तीसगडमध्येही असाच प्रकार उघड
छत्तीसगडच्या दुर्ग पोलिसांनी अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या चार तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 207 पाकिटं ब्राऊन शुगर आणि 223 नग नेट्राझेपाम या नशेच्या गोळ्या जप्त केल्या. यांची किंमत लाखो रुपये आहे. दुर्ग पोलिसांची अंमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर असते. याच दरम्यान, कारागृहातून सुटलेले पूर्वीचे अंमली पदार्थ विक्रेते बबलू यादव आणि लकी महार यांनी मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरचा साठा आपल्याजवळ ठेवला होता. ग्रीन चौक कुंडारापाराजवळ काही लोक अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या