पाटणा: बिहारचे पोलिस महासंचालक (DGP) गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएस घेतला आहे. अचानक त्यांनी घेतलेला हा व्हीआरएस त्यांची राजकारणात एन्ट्री करण्याचं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी देखील स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र नंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती मागे घेतली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अनेक वेळा त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.
गुप्तेश्वर पांडे यांनी ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन आज सायंकाळी 6 वाजता ट्विटरवरुन काही घोषणा करणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
IPS अधिकारी गुप्तेश्वर पांडे यांच्याविषयी...
1987 बॅचचे IPS ऑफिसर गुप्तेश्वर पांडे यांना जानेवारी 2019 मध्ये बिहारच्या पोलिस महासंचालकपदी बढती मिळाली. त्यांचा डीजीपीचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत होता. मात्र त्यांनी मंगळवारी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर गुप्तेश्वर पांडे हे विधानसभा निवडणूक लढू शकतात आणि ते एनडीएचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बक्सर जिल्ह्याच्या गेरुआबंध गावात झाला. त्यांचं शिक्षण पाटणा विद्यापीठात झालं. ते 1987 साली आयपीएस अधिकारी झाले.
रिया चक्रवर्तीबाबतच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या बिहारच्या डीजीपींचं स्पष्टीकरण
याआधीही घेतली होती स्वेच्छानिवृत्ती
बिहारच्या अनेक जिल्ह्यात त्यांनी एसपी आणि रेंज डीआयजी अशा पदांवर काम केलं. तसंच ते मुजफ्फरपुरचे झोनल आयजी देखील होती. एडीजी मुख्यालय आणि डीजी बीएमपीची पदं देखील त्यांनी भूषवली. केएस द्विवेदी सेवानिवृत झाल्यानंतर 2019 मध्ये ते बिहारचे पोलिस महासंचालक झाले. आयजी असताना गुप्तेश्वर पांडेय यांनी 2009 मध्ये व्हीआरएस घेतली होती. त्यावेळी बक्सर लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणांमुळे त्यावेळी ते निवडणुकीच्या मैदानात उतरले नाहीत आणि पुन्हा सेवेत रुजू झाले.
'माझ्या स्वेच्छानिवृत्तीचा आणि सुशांत प्रकरणाचा काही संबंध नाही'
आपल्या सेच्छानिवृत्तीबाबत बोलताना ते म्हणाले की, मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. हा माझा अधिकारी आहे. दोन महिन्यांपासून माझं जगणं अवघड होऊन बसलं होतं, मला रोज राजीनाम्याबद्दल फोन येत होते, मात्र मी यावर काही बोललो नव्हतो. आजवर माझ्या निष्पक्षतेवर कुणीही बोट दाखवू शकत नाही. मी सर्वांसाठी काम केलं. कुण्याही गुन्हेगाराला सोडलं नाही आणि निर्दोषांवर अन्याय केला नाही, असं ते म्हणाले.
गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, मी 34 वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. आथा काही लोकं मला ट्रोल करत आहेत. सुशांत प्रकरणाशी संबंध जोडत आहेत. मात्र माझ्या स्वेच्छानिवृत्तीचा आणि सुशांत प्रकरणाचा काही संबंध नाही. मी सुशांतच्या हताश आणि निराश वडिलांची मदत केली. मी त्याचवेळी बोललो ज्यावेळी आमच्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची रियाची लायकी नाही : बिहारचे पोलीस महासंचालक