ABP-CVoter Bihar Exit Poll 2020 LIVE: बिहार विधानसभा निवडणूक | एक्झिट पोल : कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

ABP-CVoter Bihar Election 2020 Exit Poll Results LIVE Updates: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी 28 ऑक्टोबरला मतदान झाले, दुसर्‍या टप्प्यातील 94 जागांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान झाले आणि तिसर्‍या टप्प्यातील 78 विधानसभा जागांसाठी सात नोव्हेंबरला मतदान होत आहे. 10 नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल लागणार आहेत. प्रत्येक क्षणाची अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Nov 2020 07:22 PM
अरेखच्या टप्प्यात आतापर्यंत 47 टक्के मतदान
बिहारच्या 243 जागांच्या एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. नितीशकुमार यांना 37.7 टक्के मते मिळाली आहेत. लालूंच्या पक्षाला 36 टक्के मते मिळाली आहेत. जागांची चर्चा केल्यास नितीशकुमार यांच्या युतीला 104 ते 128 तर लालू आघाडीला 108 ते 131 जागा मिळू शकतात, चिराग पासवान यांना 1 ते 3 आणि इतरांना 4 ते 8 जागा मिळतील.

पार्श्वभूमी

ABP-CVoter Bihar Exit Poll Results LIVE: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान संपताच सर्व 243 जागांचे मतदान पूर्ण होईल. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाले असून तिसर्‍या टप्प्यातील 78 जागांवर आज मतदान होत आहे. निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला येईल. अशा परिस्थितीत एबीपी न्यूजने निवडणूक निकालापूर्वी आपल्या प्रेक्षक आणि वाचकांसाठी एक्झिट पोल आणला आहे.


 


बिहारमधील एकूण 243 विधानसभा जागांपैकी 38 जागा अनुसूचित वर्गासाठी तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. बिहारमध्ये एकूण 7,29,27,396 मतदार आहेत. त्यापैकी 1,60,410 सेर्व्हीस मतदार आहेत.


 


बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी मतदान झाले, दुसर्‍या टप्प्यातील 94 जागांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान झाले आणि तिसर्‍या टप्प्यातील 78 विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल तीन दिवसांनी लागणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.