Bihar Election 2015 Results :  बिहार निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे.  नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.


2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीला सर्वाधिक 80 जागा मिळाल्या होत्या. तर दुसऱ्या नंबरवर नितिशकुमार यांचा जेडीयू पक्ष होता. त्यांनी 71 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपला 53, काँग्रेसला 27, एलजेपीला 2, आरएलएसपीला 2, हम पार्टीला 1 आणि 7 जागा अपक्षांना मिळाल्या होत्या.  2015 मध्ये नितीश कुमार यांची जेडीयू, लालू प्रसाद यादवची आरजेडी आणि काँग्रेसने महागठबंधन बनवून बीजेपी, आरएलएसपी आणि एलजेपीच्या गठबंधन विरोधात विजय मिळवला होता.


Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?


बिहारमध्ये तीन टप्प्यात पार पडलं होतं  मतदान
बिहारमध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडलं होतं. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 विधानसभा जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यांत 15 जिल्ह्यांच्या 78 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सात नोव्हेंबर रोजी पार पडलं. सर्व टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची आज मोजणी सुरु आहे. यानंतर पुढील पाच वर्षांत बिहारची सत्ता कोणाकडे जाणार हे ठरणार आहे. बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पूर्व चंपारण, सीवान, बेगुसराय आणि गयामध्ये प्रत्येकी तीन तर नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसामध्ये प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्र बनवले आहेत.


एक्झिट पोल काय सांगतात?
एबीपी-सी-वोटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीला 104-128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महागठबंधनला 108-131 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त चिराग पासवान यांच्या एलजेपीला केवळ 1 ते 3 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांच्या पारड्यात 4 ते 8 जागा जाण्याची शक्यता आहे.


Bihar Election Results | नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहार निवडणुकीचा आज निकाल!


गठबंधनमध्ये कोणाला किती जागा मिळू शकतात?
एबीपी न्यूज-सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तसेच भाजपला 66 ते 74 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. व्हीआयपीला 0-4 जागा आणि हमला 0-4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.याव्यतिरिक्त महागठबंधनचं पाहिलं तर आरजेडीला 81-89 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि काँग्रेसला 21 ते 39 जागा मिळू शकतात. याव्यतिरिक्त डाव्या पक्षांना 6 ते 13 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
Bihar Election Results LIVE: बिहार निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट, पाहा एका क्लिकवर
कोणी किती जागांवर निवडणूक लढवली?
एनडीएमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूने 115 जागांवर भाजपने 110, विकासशील इन्सान पार्टीने 11 आणि जीतनराम मांझी यांच्या हम (हिंदुस्थानी अवाम मोर्चा) ने 7 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. परंतु, यंदाच्या वेळी बिहार निवडणुकीत लोजपाची साथ एनडीएला मिळालेली नाही. एलजेपीचे प्रमुख चिराग पासवान यांनी वेगळा मार्ग निवडत एकट्याने निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) 144 जागांवर निवडणूक लढणार आहे. यांच्यासोबत काँग्रेस 70 जागांवर लढत आहे. CPI-(एमएल) 19 जागांवर, सीरीआय 6 जागांवर आणि सीपीआय एम 4 जागांवर निवडणूक लढत आहे.