Bhutan Civilian Award : भूतान (Bhutan) सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहे. हा पुरस्कार मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्यासाठी दिला जाणार आहे. भूतान सरकारकडून पंतप्रधान मोदी यांना 'नगदग पेल जी खोरलो' (Ngadag Pel Gi Khorlo) सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याआधीही पंतप्रधान मोदी यांनी अनेक देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात ट्विट करत घोषणा करण्यात आली आहे. भूतान पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, ''भूतानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्याची घोषणा करताना आम्हांला अतिशय आनंद होतं आहे. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानसाठी जे सहकार्य आणि पाठिंबा दिला ते अतुलनीय आहे. पंतप्रधान मोदी या पुरस्काराचे मानकरी आहेत. भूतानवासियांकडून मोदी यांनी खूप खूप शुभेच्छा.''
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी कूवर (Koo) पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, "भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पोने' सन्मानित केल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पंतप्रधानांना त्यांच्या अभूतपूर्व नेतृत्व आणि दृढनिश्चयामुळे हा सन्मान मिळाला. ही सर्व देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे."
महत्त्वाच्या बातम्या :
- Pfizer COVID Pill : दिलासादायक! फायझर गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी, ओमायक्रॉनवरही प्रभावी
- NDA Exam Result 2021 : शाब्बास पोरींनो! एक हजार मुली NDAची परीक्षा पास, आता कठोर चाचण्या मग निवड...
- Trending : भारतीय तरुणाने दाखवल्या गुगलमधल्या त्रुटी, जिंकले 3.5 लाख रुपये
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha