Himanta Biswa Sarma Reaction on Nyay Yatra In Assam : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नागालँडमधून आसाममध्ये (Bharat Jodo Nyay Yatra In Assam) पोहोचली आहे. शिवसागर जिल्ह्यातून सुरू झालेली ही यात्रा आसामच्या 17 जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये गुवाहाटी शहराचाही समावेश करण्यात आला आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी आज गुरुवारी (18 जानेवारी) सांगितले की भारत जोडो न्याय यात्रा गुवाहाटी शहरात प्रवेश करणार नाही.
गुन्हा नोंदवून निवडणुकीनंतर अटक करेन
प्रसारमाध्यमांशी बोलताना आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आम्ही म्हटले आहे की कोणीही शहरांच्या आत जाऊ नये. जो पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याला परवानगी दिली जाईल, पण शहराच्या आत जाण्याचा आग्रह असेल तर आम्ही पोलिसांची व्यवस्था करणार नाही. मी गुन्हा नोंदवून निवडणुकीनंतर अटक करेन. मी आता काहीही करणार नाही."
हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, “ही न्याय यात्रा नसून मियाँ यात्रा आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते प्रवास करत आहेत. यासोबतच त्यांनी गांधी कुटुंबावर हल्लाबोल करत म्हटले की, “माझ्या मते हे गांधी कुटुंब देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. देशातील बोफोर्स ते भोपाळ गॅस घोटाळ्यातील आरोपींना पळवून नेण्यापर्यंतचा यात समावेश आहे. सर्वात भ्रष्ट कुटुंब म्हणजे गांधी घराणे. हे केवळ भ्रष्टच नाही तर डुप्लिकेट आहे. त्यांच्या घराण्याचे नाव गांधी नाही. तो डुप्लिकेट नावाने फिरत आहे.”
इतर महत्वाच्या बातम्या