Ram Temple Ayodhya : सध्या सगळीकडे राम मंदिराची चर्चा आहे. राम (Ram Temple Ayodhya)मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिमाखदार सोहळ्या आपल्या डोळ्यात साठवूण घेण्यासाठी अनेक राम भक्त प्रयत्नशील दिसत आहेत. अनेकांना राममंहिराच्या या दिमाखदार सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र देशभरातील प्रत्येक राम भक्तासाठी  22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. या सोहळ्यात लोकांनी व्हर्च्युअली सहभागी व्हावे, असे आवाहन राम मंदिर ट्रस्टने केले आहे. देशभरातील गावे आणि शहरांमधील सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिरांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यादरम्यान मुख्य विधी करतील.


कुठे पाहता येणार दिमाखदार सोहळा?


अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरातून सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अयोध्या धाममधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दूरदर्शनच्या डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल चॅनेलवर या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. दूरदर्शन इतर वृत्तसंस्थांसोबतही फीड शेअर करणार आहे. इतर ब्रॉडकास्टर्ससाठी दूरदर्शन युट्युब लिंक शेअर करणार आहे.


40 कॅमेरे बसवण्यात येणार


अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराचा अभिषेक सोहळा थेट दाखवण्यासाठी दूरदर्शन सुमारे 40 कॅमेरे बसवत आहे. नवनिर्मित राम मंदिर परिसराव्यतिरिक्त शरयू घाटाजवळील राम की पायरी, कुबेर टिळ्यावरील जटायु पुतळा अशा ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही सर्व छायाचित्रे दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर दाखवली जाणार आहेत.


मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण


प्रभू राममंदिराचा हा पवित्र सोहळा संपूर्ण देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवण्याची तयारी दूरदर्शनने केली आहे. जगभरातील अनेक भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याशिवाय भारतभरातील हजारो मंदिरे आणि चौक्यांवरही हा कार्यक्रम प्रसारित करण्याची तयारी करण्यात येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या खास प्रसंगी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक निमंत्रित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune To Ayodhya Train : पुणेकरांनो चलो अयोध्या! पुणे ते अयोध्या 15 विशेष ट्रेन, कधीपासून करता येणार प्रवास?