Bengaluru airport : धुवाँधार अवकाळी पावसाने बेंगळुरू विमानतळावर टर्मिनल 2 मध्ये गळती लागल्याने विमानसेवेवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत 17 उड्डाणे विस्कळीत झाली असून मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे चेन्नईकडे उड्डाण वळवण्यात आली आहेत. 






रात्रभर मुसळधार पावसाने बेंगळुरूमधील फ्लाइट ऑपरेशन्सवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे विमानतळाच्या टर्मिनल 2 लाही गळती लागली. गळतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुरुवारी रात्री मुसळधार पावसाने आणि जोरदार वाऱ्यांमुळे लँडिंगवर परिणाम झाला. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांसह अनेक उड्डाणे वळवण्यात आली, असे बेंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.






BIAL हे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकृत ऑपरेटर आहे. बीआयएएलच्या प्रवक्त्याने सांगितले की शुक्रवारी प्रतिकूल हवामानामुळे 13 देशांतर्गत उड्डाणे, तीन आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे आणि एक आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाण चेन्नईला रवाना करण्यात आले. वादळी हवामानामुळे जयनगर, नृपतुंगा नगर आणि आरआर नगरसह शहरातील विविध भागांतील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तथापि, उन्हाळ्याच्या तीव्र तापमानापासून मोठा दिलासा मिळाला आहे. बेंगळुरुमध्ये पाण्याची वाणवा सुद्धा सुरु आहे. 


बेंगळूरुमध्ये सलग चौथ्या दिवशी पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत बेंगळुरूमध्ये 24 तासांच्या कालावधीत 14 मिमी पाऊस पडला आहे. शहराचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस इतके होते. 


इतर महत्वाच्या बातम्या