Air Hostess Death Case : कर्नाटकातील बंगळूरू येथील 28 वर्षीय एअर होस्टेस अर्चना धीमानच्या मृत्यूप्रकरणी एक नवीन खुलासा समोर आला आहे. अर्चनाचा चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला आहे. आता तिच्या आईने सोमवारी (13 मार्च) दावा केला की, तिच्या मुलीला तिच्या प्रियकराने ढकलून दिल्याने ती इमारतीवरून खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. अर्चनाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे. 


दक्षिण-पूर्व बंगळुरू शहराचे डीसीपी सीके बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांच्या तक्रारीवरून आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अर्चनाच्या मृत्यूबाबत पोलिसांनी आधी सांगितले होते की, ती बाल्कनीतून घसरल्याने पडली होती. परंतु आता अर्चनाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.  






 


Air Hostess Death Case : डेटिंग अॅपवरून ओळख


अर्चना आणि संशयिताची सहा महिन्यांपूर्वी डेंटिंग अॅपद्वारे भेट झाली होती. प्रियकर बंगळुरूमध्ये तर मृत अर्चना दुबईत कामाला होती. दोघेही रोज भेटत असत. अर्चनाचा मृत्यू झाला त्या दिवशीही दोघांची भेट झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  


Air Hostess Death Case :काय आहे प्रकरण ? 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (10 मार्च) रात्री बंगळुरू येथील कोरमंगला भागातील रेणुका रेसिडेन्सी येथे घडली. प्रियकराच्या सांगण्यावरूनच अर्चना त्याला भेटण्यासाठी दुबईहून बंगळुरूला आली होती. दोघेही अनेक महिने रिलेशनशिपमध्ये होते. मृत एअर होस्टेस हिमाचल प्रदेशची रहिवासी होती आणि तिचा प्रियकर केरळचा आहे.