नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. बाबुल सुप्रियो आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, राजकरणात न राहता देखील ते सामाजिक कार्य करू शकतात. ते कोणत्याही पक्षात जाणर नाही. पुढे म्हणाले की टीएमसी, कॉंग्रेस किंवा सीपीएम कोणत्याही पक्षाने त्यांना बोलावले नाही.  भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे.


आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, "मी कोणत्याही पक्षात जाणार नाहीये.  मला कोणत्या पक्षाने बोलावलेले नाही. मी कुठेही जाणार नाही. समाजसेवा करण्यासाठी राजकरणात असण्याची आवश्यकता नाही."


 






निवडणुकीअगोदरच पक्षाबरोबर माझे काही मतभेद होते, त्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सर्वांसमोर  उघड झाल्या होत्या. पराभवाची जबाबदारी घेत आहे, परंतु दुसरे नेते देखील जबाबदार असल्याचे बाबुल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 


बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार पदाचा राजीनामा देऊन, मी माझे शासकीय निवसस्थान महिनाभरात सोडेल, असंही बाबुल सुप्रियो म्हणाले आहेत.


बाबुल सुप्रियो म्हणाले , एकदा  विमान प्रवास करताना  रामदेव बाबांशी माझी चर्चा झाली. पश्चिम बंगालची निवडणूक भाजप गंभीरपणे घेत आहे. पण त्यांना एकही जागा मिळणार नाही, असं मी ऐकलं. तेव्हा  मला खूप वाईट वाटले.  तेव्हा असा विचार आला की जो बंगाली श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयींवर एवढं प्रेम करतो, तो भाजपला का निवडणुकीत एकही जागा देऊ शकत नाही, असे कसे होऊ शकते. विशेषत: जेव्हा नरेंद्र मोदीच पुढील पंतप्रधान असेल असं सर्व भारतीयांनी ठरवलेलं असताना बंगालने वेगळा विचार का करावा? असं विचार आला. त्यामुळे एक बंगाली म्हणून एक आव्हान स्वीकारलं.  


अनिश्चिततेच्या संकटाला न घाबरता त्यावेळी मनाला  जे योग्य वाटलं तो निर्णय घेतला.  1992 साली स्टँडर्ड चार्टड बँकेची नोकरी सोडून मुंबईतून जाताना जे केलं तेच आज केलं.... हे सांगताना त्यांनी कवीतेच्या ओळी लिहित आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
चल दर ..
हाँ कुछ बातें बाकी हैं..
शायद किसी दिन ..
आज नहीं या मैंने कहा..
चोल्लाम ( चलता हूँ )