Beating Retreat : दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाचा समारोप सोहळा थाटात आणि धूमधडाक्यात बीटिंग द रिट्रीटने सुरू झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या सोहळ्यानंतर आज तिन्ही दलाचे सैन्य बॅरेकमध्ये परत येईल.


राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसह अनेक मान्यवर या समारंभात उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अंगरक्षकांनी सलामी दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 46 अंगरक्षकांसह बीटिंग द रिट्रीट सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. 


यावेळी सैन्याच्या विविध 26 धून (सूर) ऐकू येतील. यंदा केरळच्या हिंद सेनेच्या धूनचाही समावेश आहे. लष्कर बॅरेकमध्ये परत आल्याचे संकेत हा कार्यक्रम देतो. या कार्यक्रमात संगीत महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.


 कॅप्टन राम सिंग आणि मेजर एचबी ब्राल यांनी कदम कदम बढ़ाए जा ही धून तयार केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेतील हे रेजिमेंटल गाणे होते.


बीटिंग रिट्रीट समारंभ हा एक प्राचीन लष्करी परंपरेचा एक भाग आहे. दिवस संपल्यानंतर युद्धभूमीवरील सैन्य त्यांच्या बॅरेकमध्ये लष्करी ट्यूनवर परतते. यावेळी ध्वज उतरवण्यात येतो. त्यामुळे प्रजासत्ताक दिनादरम्यान सशस्त्र दलाच्या तुकड्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर बॅरेकमध्ये परत येतात. प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवसांनी म्हणजे 29 जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळी बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे आयोजन केले जाते.


महत्वाच्या बातम्या