नवी दिल्ली : नोटाबंदीच्या घोषणेनंतर मोदी सरकारकडून डिजिटल इंडिया आणि कॅशलेस इकोनॉमीची केवळ हवा केली होती का? असा प्रश्न आता समोर येत आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात देशातील बँकांनी जवळपास 358 एटीएमना टाळं ठोकलं आहे. त्यामुळे डिजिटील इंडियाची भाषा करणाऱ्या भारतात एटीएमची संख्या 0.16 टक्क्यांनी कमी झाली आहे.
जून महिन्यात एसबीआयच्या देशभरातील एटीएमची संख्या 59,291 इतकी होती, जी ऑगस्ट महिन्यात कमी होऊन 59,200 झाली आहे. तर पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमची संख्या 10502 होती. पण ऑगस्ट महिन्यात पंजाब नॅशनल बँकेने जवळपास 400 एटीएम बंद केल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये एचडीएफसी आणि आयसीआयीआय बँकेसारख्या खासगी बँकांचाही समावेश असल्याचं बोलल जात आहे.
दर महिन्याचं एटीएमचं भाडं, सिक्युरिटी स्टाफ, एटीएम ऑपरेटर्स, मेटेनन्स चार्ज आणि वीजबिलाचा खर्च 1 लाखांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे एटीएमची संख्या कमी करण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे.
दरम्यान, गेल्या चार वर्षात देशभरात एटीएममध्ये 16.4 टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती. पण नोटाबंदीनंतर केवळ एका वर्षात 3.6 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
डिजिटल इंडियाची नुसती हवा, ऑगस्टपर्यंत देशभरातील 358 एटीएमना टाळं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Oct 2017 07:42 PM (IST)
जून ते ऑगस्ट महिन्यात देशातील बँकांनी जवळपास 358 एटीएमना टाळं ठोकलं आहे. त्यामुळे डिजिटील इंडियाची भाषा करणाऱ्या भारतात एटीएमची संख्या 0.16 टक्क्यांनी कमी झाली आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -