Coronavirus Cases Today in India : देशात दिवसेंदिवस कोरोना  रुग्णांच्या (Coronavirus)  संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे. कालच्यापेक्षा आजही कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात देशात 44 हजार 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, काल देशात 50 हजार 407 कोरोना रुग्णांची नोंद झाली होता. सध्या देशात पॉझिटीव्हीटी रेट हा 3.17 टक्क्यांवर गेला आहे. 


सक्रीय रुग्णांची संख्या घटली


सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्यादेखील घटला आहे. देशात सध्या  5 लाख 37 हजार 45 सक्रीय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 8 हजार 665 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर आत्तापर्यंत  4 कोटी 15 लाख 85 हजार 711 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 


 





देशाची राजधानी दिल्लीचा विचार केला तर शनिवारी दिल्लीत 920 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत कोरोना संक्रमणाचा दर हा घटला आहे. तो सध्या 1.68 टक्क्यांवर गेला आहे. दिल्लीत आत्तापर्यंत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा हा 18 लाख 50 हजार 516 झाला आहे. तर आत्तापर्यंत दिल्लीत कोरोनामुळे  26 हजार 60 जणांनी आपला प्राण गमावला आहे.
 
सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत देशात 172 कोटीपेक्षा जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 49 लाख 16 हजार 801 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आत्तापर्यंत देशात एकूण 172 कोटी 81 लाख 49 हजार 447 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेलया माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना आतापर्यंत 1.72 कोटींहून अधिक सावधगिरीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी कोरोना महामारीविरूद्ध देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या बातम्या: