लखनऊः भारतामध्ये एवढे श्वानप्रेमी आहेत की, बरेच जण परदेशातून श्वान आणूण पाळतात. पण आता परदेशातून श्वान आणला तर पश्चात्तापाची वेळ येणार आहे. कारण परदेशातून श्वान आणूण पाळण्यावर भारत सरकारने आता बंदी घातली आहे.
प्रजननासाठी किंवा कोणत्याही व्यवसायिक कारणांसाठी परदेशातून श्वान आणणे, हा गुन्हा असेल, अशी सूचना विदेशी व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काढली आहे. जर
घरगुती श्वान असेल तर परवानगी आवश्यक
परदेशातून श्वान आणूण पाळता येणार नाही किंवा कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी त्यांचा वापर करता येणार नाही. घरगुती श्वान असेल, तर त्यासाठी सुद्धा एका ठराविक कालावधीची परवानगी काढावी लागेल, असे सूचनेमध्ये सांगण्यात आले आहे.
भारतामध्ये परदेशातून श्नान हा लष्कर, पोलिस दल किंवा संशोधन अशा सरकारी कामांसाठीच आणता येणार आहे.
दरम्यान, अनेक श्वानप्रेमींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण थेट बंदी घालणं चूकीचं असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.