मुंबई : शॉपिंग ही महिलांची सर्वात आवडती गोष्ट. खरेदीसाठी अनेक महिला, तरुणी मॉल किंवा दुकानात जातात. कपडे व्यवस्थित आहेत की नाही हे पाहण्यासाठी ट्रायल रुममध्ये जातात. पण केंद्रीय मंत्री मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत फॅब इंडियामध्ये घडलेल्या प्रकारानंतर, आता अनेक महिलांना चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा तर नसेल ना अशी भीती असते.


 

मात्र ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा किंवा तिथल्या आरशामागे तिसरंच नाही ना जे तुमच्यावर नजर ठेवून आहे, हे हातांच्या बोटांनी तपासता येऊ शकतं.

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एक वर्षापूर्वी गोव्यातील फॅब इंडियाच्या शोरुममध्ये शॉपिंगसाठी गेल्या होत्या. शोरुमच्या ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचं त्यांनी उजेडात आणलं होतं. स्मृती इराणींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर देशात खळबळ माजली होती. पण मॉल किंवा दुकानाच्या चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याची घटना समोर येण्याची ही पहिली वेळ नाही.

 

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दावा केला आहे की, बोट आरशावर ठेवलं की चेंजिंग रुममध्ये केवळ आरसा आहे की दुसऱ्या बाजूने तुम्हाला कोणी पाहत आहे, हे समजू शकेल. इतकंच नाही तर तो आरसाच आहे कसं ओळखावं याची पद्धतही सांगितली आहे.

 

कसा ओळखाल फरक?

चेंजिंग रुममध्ये गेल्यावर महिलांनी कपडे बदलण्याआधी आरशावर बोट ठेवून पडताळणी करावी. आरशावर बोट ठेवल्यावर खऱ्या बोटामध्ये आणि प्रतिबिंबामध्ये गॅप दिसत असेल, तर आरसा योग्य आहे. मात्र बोट आणि आरशात दिसत असलेल्या बोटात गॅप दिसला नाही तर समजा की आरशामध्ये गडबड आहे.

 

 

व्हायरल फोटोचं सत्य



व्हायरल होत असलेल्या या फोटोचं सत्य जाणण्याचा प्रयत्न एबीपीने केला. यासंदर्भात डिटेक्टिव्ह संजीव देशपाल यांचा सल्ला घेतला. वन वे आणि टू वे मिरर काय असतं आणि तो कसा ओळखावा हे त्यांनी समजावलं.

 

संजीव देशपाल यांच्या माहितीनुसार, "आरशावर बोट किंवा बोटाचं नख ठेवून पाहा. जर बोट आणि आरशात दिसणारं बोट यांच्यात काही गॅप दिसला तर तो सामान्य आरसा आहे. पण बोट आणि त्याच्या प्रतिबिंबामध्ये गॅप नसेल तर याचा अर्थ आरसा सामान्य नाही. आरशाच्या दुसऱ्या बाजूने तुम्हाला पाहिलं जात आहे. पण कधीतरी हा गॅप एवढा कमी असतो की आरसा खरा आहे की त्यात छेडछाड केली आहे, हे ओळखणं कठीण होतं. अशा परिस्थितीत जर महिलांना आरशामध्ये गडबड असल्याची शंका आली तर त्यांनी तातडीने ती चेंजिंग रुम सोडावी.

 

त्यामुळे एबीपीच्या पडताळणीत व्हायरल होत असलेला हा फोटो सत्य आहे.

 

पाहा व्हिडीओ