Ayodhya Ram Temple : अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठेची जोरदार तयारी सुरु आहे. रामलल्लाच्या (Ram Lala) अभिषेकासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी साधूसंतांना निमंत्रण पत्र पाठवण्यात आली आहेत. दरम्यान रामलल्लाचे कपडे थेट सीमा पार पाकिस्तातून अयोध्येत पोहोचले आहेत.  उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरात रामलल्ला आणि इतर देवतांच्या अभिषेक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यासाठी सध्या तयारी सुरु आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून रामललाचा पोशाख अयोध्येत पोहोचला आहे.


थेट सीमापार पाकिस्तानातून आणला रामलल्लाचा पोशाख


पाकिस्तानातून प्रभू श्रीरामाचे कपडे अयोध्येत पोहोचले आहेत. पाकिस्तानातील सिंधी लोकांनी हा रामलल्लासाठी हा खास पोशाख पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून पाठवला आहे. हा पोशाष रामलल्लाला परिधान केला जाईल. अयोध्येत 22 जानेवारीला मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. रामलल्लाचा पेहराव पाकिस्तानातून अयोध्येतील सिंधी कॉलनीतील रामनगरमध्ये पोहोचला आहे. 




रामलल्लाच्या पोशाखाची पूजा आणि शुद्धीकरण


रामनगरच्या देवालय मंदिरात रामलल्लाच्या पोशाखाची पूजा करण्यात आली. हिंदू रीतिरिवाजानुसार, कापड शुद्ध करण्यासाठी 21 पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारांसह आरती केली. रविवारी, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सिंधी समाजाचे लोक रामलल्लाचा पोशाख राम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करणार आहेत. यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून शेकडो लोक अयोध्येत दाखल झाले आहेत. 22 जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक पार पडणार आहे. 


सुमारे चार हजारहून अधिक संतांना निमंत्रण


रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी सर्वात आधी संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यात देशभरातून सुमारे चार हजार संत जमणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे राम लल्लाच्या जीवन अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रणपत्रिका वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वप्रथम ऋषी-मुनींना आमंत्रणे पाठवली गेली. यासाठी कार्ड तयार करण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी देशातील विविध परंपरेतील सुमारे चार हजार संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी निमंत्रण पत्र पाठवले आहे.