नवी दिल्ली : बर्ड फ्लूचा संसर्ग एखाद्या मानवाला झाल्याचं पाहायवला मिळालं नव्हतं. पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. रशियामध्ये मानवामध्ये बर्ड फ्लू व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. H5N8 एवियन फ्लू म्हणजेच, बर्ड फ्लू व्हायरस व्यक्तींमध्ये आढळून आल्याचं रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. रशियाच्या रिसर्च सेंटर वेक्टरच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पोल्ट्री फार्ममधील सात कर्मचाऱ्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. रोसपोत्रेनादजोरच्या वेक्टर रिसर्च सेंटरने व्यक्तींमध्ये हा व्हायरस सापडल्याची माहिती दिली आहे.
अन्ना पपोवाने रशिया 24 ब्रॉडकास्टरला दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात रशियाच्या दक्षिणेकडील एका पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूच्या महामारीने हैदोस घातला होता. तिथे काम करणाऱ्या सात लोकांना या व्हायरसची लागण झाली होती. अन्ना पपोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लूची बाधा झालेल्या सर्व व्यक्ती ठिक आहेत. या सर्व व्यक्तींमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत.
दरम्यान, भारतातही अेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. अनेक भागांत पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांचं परिक्षण केल्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं होतं. अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कोंबड्यांना मारण्याचे आदेश दिले होते. दिल्लीतही सरकारने कोंबड्यांचे बाजर बंद केले होते. दरम्यान, काही दिवसांनी सरकारने ही बंदी उठवली होती.