13th August In History : अवयवदानाच्या (Organ Donation Day) महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि अवयवदानाबद्दल असलेल्या गैरसमजांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन (Organ Donation Day) साजरा केला जातो. या मागचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे लोकांना अवयवदान करून अधिक जीव वाचवण्यासाठी आणि अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि शिक्षित करणे आहे. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे आणि फुफ्फुसे यासारख्या अवयवांचे दान केल्याने दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोकांचा जीव वाचू शकतो.
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 12 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या महत्त्वाच्या घटनांची मालिका पुढीलप्रमाणे,
अवयवदान दिन (Organ Donation Day)
1954 मध्ये रोनाल्ड ली हेररीक (Ronald Lee Herrick) या व्यक्तीने पहिल्यांदा अवयव दान (Who is The First person to Donate Organs) केलं होतं. त्याने जुळ्या भावाला मूत्रपिंड (Kidney) दान केलं होतं.
दरम्यान, भारतातील पहिलं अवयवदान 1998 मध्ये करण्यात आलं होतं. 6 नोव्हेंबर 1998 रोजी डॉ. ए.एस. दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये 42 वर्षीय भारत भूषण यांच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. एका रुग्णाला ब्रेन-डेड घोषित करण्यात आले, त्याने अवयव दान केलं होतं.
1976 : लेफ्ट हँडर्स डे
जागतिक लेफ्ट हॅन्डर्स डे (National Left Handers) हा डाव्या हाताच्या व्यक्तींचे वेगळेपण आणि फरक साजरा करण्यासाठी दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा दिवस आहे. डीन आर. कॅम्पबेल यांनी 1976 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता.
1917 : नोबेल पारितोषिक विजेते एडवर्ड बुचनर यांचं निधन
जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते एडवर्ड बुचनर यांचे निधन झाले. 13 ऑगस्ट
1951 : हिंदुस्थान ट्रेनर 2, भारतात निर्मित पहिल्या विमानाने पहिले उड्डाण केले.
1956 : राष्ट्रीय महामार्ग विधेयक लोकसभेत मंजूर झालं.
1784 : भारतातील प्रशासकीय सुधारणांसाठी पिटचे भारत विधेयक ब्रिटिश संसदेत सादर केले गेले.
1829 : इव्हान मिखायलोविच सेचेनोव्ह, एक प्रसिद्ध रशियन मानसशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ आणि वैद्यकीय शास्त्रज्ञ यांचा जन्म झाला.
1917 : जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते एडवर्ड बुचनर यांचे निधन.
1989 : बेल्जियन सायकलपटू विली डी ब्रुयन यांचं निधन
2000 : पाकिस्तानी गायिका-गीतकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या नाझिया हसन यांचं निधन.
2008 : टाटा स्टील या जगातील आघाडीच्या पोलाद कंपनीने व्हिएतनाममधील दोन मोठ्या कंपन्यांशी संयुक्तपणे तेथे स्टील कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी करार केला.
2008 : भारताने मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर (MBRL) वेपन सिस्टम पिनाकाची यशस्वी चाचणी केली.
2008 : चक्रवर्ती संगराजन, एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ आणि रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर, यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले.
2010 - उत्तर ध्रुवावर विषारी वायूचे ढग जमा झाले. यातून मध्य रशिया, सायबेरिया आणि पश्चिम कॅनडातील जंगलातील आगीतून दररोज 70 दशलक्ष टन विषारी कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जित झाला.