NIA Action : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. एनआयएकडून आज पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), राजस्थान (Rajasthan) आणि दिल्ली- (Delhi) एनसीआर प्रदेशात दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थांचे तस्करांवर तसेच त्यांच्या अनेक अड्ड्यांवर छापे टाकण्यात येत आहे.


दहशत पसरवण्यासाठी परदेशातून पैसे


नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने मंगळवारी दहशतवादी आणि ड्रग्ज तस्कर यांच्यातील संबंधाविरोधात मोठी कारवाई केली. एनआयएने दहशतवादी संबंधांबाबत देशभरातील अनेक गुंडांच्या लपलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआर प्रदेशात आज दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील संबंध तोडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी परदेशातून दहशतवाद्यांना पैसे आणले जात आहे. सुरक्षा यंत्रणांची नजर या नेटवर्कवर विशेष आहे. गेल्या आठवड्यात एनआयएने जम्मू- काश्मीरमधील शोपियान आणि राजौरी जिल्ह्यात छापे टाकले.


 






 


विविध स्तरावर नेटवर्क


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी यापूर्वी यूएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल केले होते, त्याच प्रकरणांची दखल घेत एनआयएने कारवाई केली आहे. परदेशात आणि भारतातील वेगवेगळ्या तुरुंगात बंद असलेले गुंड हे विविध स्तरावर आपले नेटवर्क चालवत असून सातत्याने गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले आहे.



 40 हून अधिक ठिकाणांवर छापे


दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील 40 हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी आज एनआयएचे छापे पडत आहेत. या कारवाईत पथकांचा सहभाग आहे. असे देखील सांगितले जात आहे की बहुतेक छापे हरियाणा, उत्तराखंड आणि पंजाबमधील आहेत. दिल्लीत लाल बवाना परिसरात नीरज बवाना यांच्या अड्ड्यावर आहे. या छाप्यात अटकेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत छाप्यात अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.



गेल्या महिन्यात 50 ठिकाणी छापे


याआधी 12 सप्टेंबर रोजी एनआयएने पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली-एनसीआरमधील 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. एनआयएने तपास स्वत:च्या हातात घेऊन छापेमारी सुरू केली आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, दगडूशेठ मंदिरात शिरलं पाणी