ATS Raids in Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुकांचं (Gujarat Assembly Election 2022) बिगुल वाजलं असून 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया (Voting Process) पार पडणार आहे. अशातच गुजरातमध्ये दहशतवाद विरोधी पथकानं (Anti-Terrorism Squad) कारवायांचा सपाटा सुरु केला आहे. एटीएसनं (ATS) गुजरातमधील 13 जिल्ह्यांमधील 100 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. तसेच, तब्बल 65 जणांना अटक केली आहे. काल (11 नोव्हेंबर) रात्रीपासून छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 


देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी गुजरात एटीएसनं (Gujarat ATS) मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएसनं 11-12 नोव्हेंबरच्या रात्री राज्यातील 13 जिल्ह्यांतील 100 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गुजरात एटीएसनं 65 जणांना अटकही केली आहे. अहमदाबाद, भरूच, सुरत, भावनगर आणि जामनगर येथे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बनावट बिलांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याप्रकरणी एजन्सीनं ही छापेमारी केली आहे.  


मिठाई, रिअल इस्टेट आणि फायनान्सशी संबंधित अनेक गटांवर आयकर विभागानं कारवाई केली आहे. या छापेमारीमुळे रिअल इस्टेट व्यवसायात खळबळ उडाली आहे. यासोबतच फायनान्स ब्रोकर्समध्येही भीतीचं वातावरण आहे. एटीएसनं केलेल्या छापेमारीत मोठी बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात एटीएस, जीएसटी विभागासोबत संयुक्त कारवाई केली आहे. आतापर्यंत सूरत, अहमदाबाद, जामनगर, भरूच आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये 150 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. करचोरी आणि पैशांच्या व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय मार्गांवर हे छापे टाकण्यात येत आहेत.


कोट्यवधी रुपयांचं जीएसटी चोरी प्रकरण


एबीपी न्यूजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या बऱ्याच काळापासून साजिद अजमल शेख आणि शेहजाद एटीएसच्या रडारवर होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून एटीएसची नजर होती. एटीएसनं शुक्रवारी कारवाईला सुरुवातच करताच सर्वात आधी या दोघांना अटक केली. 


एटीएसनं केलेल्या तपासात असं आढळून आलं की, साजिद आणि शहजाद राज्यभरात जीएसटी चोरीचं मोठं रॅकेट चालवतात. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची जीएसटी चोरी झाल्याचं सांगितलं जात आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांचा संबंध पीएफआय आणि हवाला रॅकेटशीही असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Gujarat Election: पंतप्रधान मोदी, गडकरी, फडणवीस यांच्यासह गुजरातमध्ये भाजपचे 40 स्टार प्रचारक