Ashneer Grover Resigns : Ashneer Grover, Fintech Unicorn BharatPe चे सह-संस्थापक, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंगापूरमधील अश्नीर ग्रोव्हरविरुद्ध तपास सुरू करण्यासाठी फिनटेक प्लॅटफॉर्मविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या लवादात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर अश्नीर यांच्या राजीनाम्याचे पडसाद उमटले. फिनटेक युनिकॉर्नच्या बोर्डाला पाठवलेल्या ईमेलमध्ये, अश्नीर ग्रोव्हर यांनी सांगितलं आहे की, मी अत्यंत दुःखी आहे, ज्या कंपनीचा मी संस्थापक आहे, आज त्याच कंपनीला निरोप देण्यासाठी मला भाग पाडलं जात आहे. 


यापूर्वी, भारतपेनं कंपनीच्या 'कंट्रोल्स' विभागाच्या प्रमुख आणि अश्नीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर (Madhuri Jain Grover) यांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली बडतर्फ केलं होतं. अंतर्गत तपासणीत फिनटेक प्लॅटफॉर्मवर असताना निधीचा गैरवापर झाल्याचं उघड झालं होतं. कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचार्‍यांविरुद्ध अयोग्य भाषा वापरल्याबद्दल अशनीर ग्रोव्हरला वादाचा सामना करावा लागल्यानंतर, त्यांची पत्नी माधुरी जैन यांनीही मार्च अखेरपर्यंत स्वेच्छा रजा घेतली होती.





नेमकं प्रकरण काय?


19 जानेवारी रोजी, भारतपेचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी मार्चपर्यंत रजेवर जाण्याची घोषणा केली होती. खरं तर, जानेवारीच्या सुरुवातीला एका ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये अश्नीर कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याला फोनवर धमकावत होते. Nykaa च्या IPO दरम्यान शेअर्स वाटप करताना बँकेकडून अनियमितता झाल्याचा आरोप करत, ते संबंधिताला धमकावत होते.


मात्र, अश्नीर यांनी ही क्लिप बनावट असल्याचे म्हणत, हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, नंतर असे लक्षात आले की, अश्नीर आणि त्यांची पत्नी माधुरी यांनी ऑक्टोबर 2021मध्ये कोटक महिंद्रा बँकेला Nyka च्या IPO ला वित्तपुरवठा करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल नोटीस पाठवली होती.


अश्नीरला नेटकऱ्यांनी केले होते ट्रोल 


शार्क टँक इंडियाचे परिक्षण करणाऱ्या अश्नीरचे काही लोक कौतुक करतात तर काही जण त्याला ट्रोल करतात. रिपोर्टनुसार या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी अश्नीर दहा लाख रूपये मानधन घेतो. अश्नीर ग्रोव्हरने  IIT दिल्लीमधून सिविल इंजिनियरिंगमध्ये B-Tech ही डिग्री मिळवली आहे. तसेच त्याने IIM अहमदाबाद मधून  MBA केले आहे.


पती-पत्नी गेले होते ऐच्छिक रजेवर!


ग्रोव्हर पती-पत्नी रजेवर गेल्यानं त्यांना कंपनीने काढून टाकण्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्यावर भारतपे कंपनीच्या बोर्डाकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, सध्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकलेलं नाही. यासंदर्भात आलेले सर्व रिपोर्ट्स निराधार आणि खोटे आहेत. कंपनी स्वतंत्र आणि कसून चौकशी करण्यास वचनबद्ध आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही कारवाई केली नाही आणि केली जाणारही नाही.  प्रसारमाध्यांना विनंती आहे की, चौकशी पूर्ण झाल्याशिवाय अथवा अहवाल येण्यापूर्वी अंदाज लावू नये. माहिती नसलेल्या स्त्रोतांच्या आधारे कोणत्याही बातम्या देऊ नये, असं स्पष्टीकरण कंपनीच्या वतीनं देण्यात आलं होतं. अशातच आता सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी आपला राजीनामा दिला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ashneer Grover : 'लोक शिव्या देतात...' ट्रोलिंगबाबत अश्नीर ग्रोव्हरने व्यक्त केल्या भावना


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha