Asaduddin Owaisi Slams RSS Chief Mohan Bhagwat : ऑल इंडिया मजेस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर निशाणा साधला, भागवतांच्या दिल्लीतील मदरशाच्या नुकत्याच दिलेल्या भेटीवर टीका ओवेसींनी केली. ओवेसी यांनी आरएसएस आणि भाजपवरही (BJP) जोरदार निशाणा साधला. 


"भाजप आणि आरएसएस आता नवीन नाटक करत आहेत." - ओवेसी
गुजरातमधील अहमदाबादमधील जुहापुरा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "भाजप आणि आरएसएस आता नवीन नाटक करत आहेत."आरएसएस प्रमुख मोहन भागवत दिल्लीतील एका मदरशात गेले, तिथे त्यांनी कुराण ऐकले आणि मदरशातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. प्रसारमाध्यमांनी त्याचे वार्तांकनही केले. असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले, "पण दुसरीकडे आसाममध्ये मदरसे उद्ध्वस्त केले जात आहेत, यूपीमध्ये सर्वेक्षण केले जात आहे, त्यांच्याकडून मुस्लिमांची संपत्ती हिसकावली जात आहे, भाजपकडे दाखवण्यासाठी काहीच नाही. ते फक्त हिंदू आणि मुस्लिम एकमेकांशी लढताना दाखवतील.


"मोहन भागवत बिल्कीस बानोला भेटू शकतात का?"


असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "मी मोहन भागवत साहेबांना विनंती करतो की, बिल्कीस बानो यांना भेटून न्याय देण्याचे आश्‍वासन द्यावे. मोहन भागवत बिल्कीस बानोला भेटू शकतात का? पण ते त्यांना भेटणार नाहीत."


मोहन भागवतांची दिल्लीतील मदरशाला भेट
देशातील मुस्लिम समाजापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीतील मशिदी आणि मदरशांना भेट दिली आणि अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांच्याशी चर्चा केली. आरएसएसच्या म्हणण्यानुसार, भागवत यांची इलियासी यांच्याशी झालेली भेट तसेच अल्पसंख्याक समुदायांशी चर्चा हा एक संघाच्या पुढाकाराचा एक भाग होता. मदरशाच्या भेटीदरम्यान मोहन भागवत यांनी तिथल्या मुलांशी संवाद साधला आणि त्यांना कुराणचे पठण ऐकले. संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलांनी 'वंदे मातरम' आणि 'जय हिंद'च्या घोषणा दिल्या.


इतर महत्वाच्या बातम्या


Cyber frauds : चीनी माफियांकडून भारतीय तरूणांची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने म्यानमारच्या जंगलात छळ 


Cambodia Cryptocurrency Fraud : महाराष्ट्रातील तरुण अडकला कंबोडियात, गुलामगिरीतून स्वत:सह सात भारतीयांची 'अशी' केली सुटका