Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. मागील तीन महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल 30 ते 35 डॉलरची घट झाली आहे. त्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरातही कपात होईल अशी अपेक्षा लोकांना आहे. आज, सकाळी सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपनी इंडियन ऑईलने आजचे इंधन दर जारी केले (Petrol Diesel Price) आहेत. आजही देशातील पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधन दरात कोणताही (Fuel Price) बदल झाला नाही.
देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात 21 मे पासून कोणताही बदल झाला नाही. तर, राज्यात जुलै महिन्यापासून कोणताही बदल झाला नाही. तर, दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 86.15 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, WTI क्रूड ऑईल दर 78.74 डॉलर प्रति बॅरल इतका होता.
>> देशातील चार प्रमुख महानगरांमधील दर:
> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.92 रुपये प्रति लिटर
> मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
> चेन्नई: पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
>> महाराष्ट्रातील इतर शहरातील दर काय?
परभणीत राज्यातील सर्वाधिक इंधन दर आहे. पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर आहे. तर, डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे.
मोबाईलवर पाहा इंधन दर
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) मोबाइलवरही इंधन दर पाहता येतील. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (