नवी दिल्ली: नोटबंदीचा निर्णय तीन दिवसात मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला.
नोटबंदीच्या विरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी दिल्लीच्या आझादपूरमध्ये आंदोलन केलं.
नोटाबंदीच्या निर्णयामागे काळा पैसा आणि भ्रष्टाचार असल्याचा दावा केजरीवाल आणि ममतांनी केला.
नोटाबंदीच्या नावे घोटाळा होत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. तसंच नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार कमी होणार नाही, तर दोन हजाराच्या नोटेमुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल, असंही केजरीवाल म्हणाले.
याशिवाय नोटा बदलण्याच्या रांगेत अंबानी, अदाणींसारखे उद्योगपती का नाहीत, असा सवालही केजरीवालांनी केला.