नेल्लोर (आंध्रप्रदेश): राज्यसभा खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दत्तक घेतलेलं आंध्रप्रदेशातील गाव पुट्टमराजु कांडरिकाची प्रगती पाहून चांगलाच खुश झाला.

हे गाव आंध्रप्रदेशमधील नल्लोर जिल्हात आहे. दोन वर्षापूर्वी दत्तक घेतलेल्या गावाचा सचिननं नुकताच दौरा केला. येथील विकास कामाचं सचिनच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

 

या विकास कार्यासाठी एकूण 2.79 कोटी खर्च करण्यात आले. यावेळी बोलताना सचिन म्हणाला की, 'गावात झालेली ही प्रगती पाहून मी फार समधानी आहे.' यावेळी सचिननं गावातील तरुणांना क्रिकेट साहित्याचं वाटपही केलं. तसेच गावातील अनेक कुटुंबाशी चर्चाही केली. तसेच स्वच्छ भारतला सफल करण्यासाठी तुमच्या एकजुटीची गरज असल्याचंही गावकऱ्यांना सांगितलं.

गावात एक स्टेडियम बनवण्यासाठी आपण आवश्यक ती मदत करु असंही सचिननं आश्वासन दिलं आहे. सचिननं खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत हे गाव दत्तक घेतलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2014 साली या गावाचा दौरा केला होता.