Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी 'हरिजन' (Harijan) शब्दाऐवजी आता 'डॉ. आंबेडकर' (Dr. Ambedkar) शब्द वापरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल यांनी 'हरिजन' शब्दाऐवजी 'डॉ. आंबेडकर' शब्द वापरण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, लवकरच हा निर्णय लागू करण्यात येईल. केजरीवाल सरकारच्या या नव्या नियमांमुळे आता दिल्लीतील वस्ती आणि रोड या ठिकाणांवर 'हरिजन' ऐवजी होणार 'डॉ. आंबेडकर' शब्दाचा वापर केला जाणार आहे. समाज कल्याण मंत्र्यांनी यासंदर्भात आवश्यक पाऊलं उचलण्यासाठी बैठक बोलावली होती.


समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी दिल्ली सचिवालयात कायदा विभाग आणि नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी सर्व गल्ल्या, वस्त्या, दवाखाने आणि वसाहतींमध्ये 'हरिजन' शब्दाच्या जागी 'डॉ. आंबेडकर' असा शब्द लिहीण्याचा प्रस्ताव सादर केला. हरिजन हा शब्द वापरू नये, अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने दिल्यानंतर ही बैठक झाली. या बैठकीत 'डॉ. आंबेडकर' या शब्दाच्या जागी 'हरिजन' शब्द टाकण्याची अधिसूचना काढण्यात आली आणि ही अधिसूचना लवकरात लवकर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.


केजरीवाल सरकारने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी संबंधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात कारवाई करून अधिसूचना जारी केली. त्यांनी सांगितलं आहे की, दिल्लीती सर्व वसाहती, गल्ली आणि रस्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावं, असा प्रस्ताव आम्ही मांडला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या