Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू आहे. ही मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे. आधीच्या दिवशी देशात 3712 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची दर 0.05 टक्के आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 लाख 25 हजाप 379 नमुने तपासण्यात आले आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण
भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 651 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून 4 कोटी 26 लाख 22 हजार 757 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 1045,
दिल्लीमध्ये 373, तामिळनाडू 145, तेलंगणात 67, गुजरातमध्ये 50 तर मध्य प्रदेशमध्ये 25 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण
कर्नाटकच्या आरोग्य मंत्री के. सुधाकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी गुरुवारी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Gujrat Fire : गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीला भीषण आग, 700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
- Sidhu Moose Wala Postmortem : सिद्धू मुसेवाला यांच्या किडनी, यकृतासह 19 ठिकाणी गोळ्यांच्या जखमा, पोस्टमॉर्टम अहवालातून उघड
- Today Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर