Arvind Kejriwal नवी दिल्ली :  महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग राजधानी नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुका जाहीर करु शकतं. या निमित्तानं अरविंद केजरीवाल यांनी तयारी सुरु केली आहे. आपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे. आपनं दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांचा मतदारसंघ देखील ठरला आहे. 


दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. आपनं आज विधानसभा निवडणुकीसाठीची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीत आपनं 38 नावांची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री अतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील. तर, मंत्री सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाश आणि गोपाल राय बाबरपूरमधून निवडणूक लढतील. 


अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या चौथ्या यादीतील 38 उमेदवारांमध्ये ज्यांनी 2020 च्या निवडणुकीत विजय मिळवला होता त्यांचा समावेश आहे. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अतिशी, सौरभ भारद्वाज, इमरान हुसैन, गोपाल राय आणि मुकेश कुमार अहलावत यांना यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय  सोमनाथ भारती, दुर्गेश पाठक, अमानातुल्ला खान यांना देखील संधी देण्यात आली आहे. 


आपमध्ये प्रवेश करताच रमेश पहलवान यांना उमेदवारी


38 उमेदवारांच्या यादीत रमेश पहलवान हे नाव आश्चर्यकारक असल्याचं दिसून येतं. कारण, रमेश पहलवान यांनी यांनी आज आम आदमी पार्टीत अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. रमेश पहलवान यांना कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश पहलवान यांच्या पत्नी कुसुमलता यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्या नगरसेवक होत्या. रमेश पहलवान आणि कुसुमलता पहलवान यांनी 2017 मध्ये आम आदमी पार्ट सोडली होती. त्यांनी आता  पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे. 


आम आदमी पार्टीनं नवी दिल्लीत सत्ता मिळवल्यानंतर पंजाबमध्ये देखील सत्ता मिळवली. अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरण प्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अतिशी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. 






इतर बातम्या :


 Narendra Bhondekar : मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय, सेनेतील पदं सोडली