Arunachal Pradesh Army Soldiers: अरुणाचल प्रदेशमधील कामेंग सेक्टरमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. जवानांची गस्त सुरू असताना हिमस्खलन झाल्याने त्यामध्ये सात जवानांना आपला प्राण गमवावा लागला आहे. भारतीय लष्कराने या वृत्ताची पृष्ठी केली आहे. 


अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमधील उंच शिखरांवर गेल्या अनेक दिवसांपासून खराब हवामान आणि जोरदार हिमवृष्टी होत आहे. कामेंग सेक्टरच्या उंच भागात 6 तारखेला हिमस्खलनाची घटना घडली होती. या घटनेनंतर बचाव पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने सात जवानांचा बर्फाखाली अडकून मृत्यू झाला. 


 




अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टर हा चीनच्या सीमेलगत असल्याने या भागात लष्कराला सातत्याने गस्त घालावी लागते. याचाच एक भाग म्हणून हे सात जवान या भागात गस्तीला गेले होते. पण अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे या जवानांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: